Ads

देशातील कोळसाखाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत

The country's coal mines are not operating at full
चंद्रपूर : देशातील कोळसा खाणी पूर्ण क्षमतेने उत्पादन करीत नाहीत. याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे काय ? व पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्यात ? याबाबत खासदार बाळू धानोरकर यांनी आज लोकसभेत प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना, कोल व खान मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कबुल केले, कि खरोखरच पूर्ण क्षमतेने वापर होत नसून भूमी अधिग्रहण प्रक्रियेतील विलंब, गेल्या काही वर्षातील मुसळधार पाऊस, ओव्हर बर्डनचे काम करणाऱ्या कंपन्यांची अतिशय खराब कामगिरी तसेच कोविड - १९ महामारी या प्रमुख कारणांनी हा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल इंडिया चे माध्यमातून या सर्व प्रकल्पावर नजर ठेवली जाते व नवीन प्रकल्पांना वेगाने पूर्णत्वास नेऊन पूर्ण क्षमतेने कोल उत्पादन करण्याचा सर्वंकष प्रयत्न केल्या जाईल. भूमी अधिग्रहण, विविध परवानग्या, आक्षेप यांचे गतीने निराकरण व उत्पादन वाढविण्यासाठी ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे उच्च क्षमतेच्या हेवी इलेक्ट्रिक मुव्हमेंट मशिनरी चा वापर तसेच ओव्हर बर्डन व कोल वाहतुकीसाठी देखील आवश्यक उपाययोजना सुरु असल्याचे केंद्रीय कोल मंत्र्यांनी उत्तरादाखल सांगितले आहे.

देशात वीज निर्मिती करण्याकरिता अलीकडेच कोळशाच्या तुटवडा पडल्याचे चित्र होते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असून देखील त्या पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याची खासदार बाळू धानोरकर यांनी लोकहितकारी मागणी केली आहे. यावर उत्तर देताना मा. मंत्री महोदयांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतल्या जाणार असल्याचे सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment