Ads

राजाश्रय असलेली "जनता गाडी" अवैध रेती तस्करीत जप्त

"Janata Gaadi" with royal shelter confiscated for illegal sand smuggling
ब्रम्हपुरी (सुभाष माहोरे ):-
तालुक्यात राजकीय प्रभावाने रेती तस्करी साठी धावणारी "जनता गाडी" म्हणून प्रसिद्ध, असलेले ट्रॅक्टर, समयसूचकता दाखवत कर्तव्यदक्ष युवा महसूल कर्मचाऱ्याने सापळा रचून तहसील कार्यालयात जमा केल्याने "आक्रमक" झालेल्या "त्या" राजकीय व्यक्तिमत्वामुळे तालुक्यातील नागरिकांना अर्हेर रेती घाटावर राजकीय प्रभावाने रेती तस्करी होतं असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैनगंगा नदी पात्राची लूट करणारे कोण...? या प्रश्नावर जनता व वृत्तपत्राने नेहमीच विविधप्रकारे बाजू मांडली मात्र "गेंड्याची कातडी" धारण केलेल्या भ्रष्ट राजकर्त्यांना एकमेकांचे हितसंबंध जोपासतांना कधीच जाग आली नाही,मात्र अवैध रेती तस्करी मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मुसक्या आवरल्या जातांना तस्करांशी संबंधितांना होणारा "जळफळाट" हा तालुक्यातील नागरिकांना हास्यकल्लोळ देऊन जातो एवढं मात्र नक्की.

मंगळवार ला अवैध तस्करी मध्ये जप्त माजी पंचायत समिती सभापती यांचा अवैध तस्करीत अग्रेसर "जनता गाडी" नावाने नागरिकात प्रसिद्ध ट्रॅक्टर , कर्तव्यदक्ष युवा महसूल कर्मचाऱ्याच्या कार्यकुशलतेने तहसील कार्यालयात जमा होताच, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तहसील पटांगणात सदर वाहणाजवळ उपस्थित होतं,तहसील कार्यालयाच्या आत-बाहेर आवेशाने ये -जा करीत होत्या तर छोटे-मोठे अधिकारी वर्ग आपला भ्रमणध्वनी "स्विच ऑफ" करून असल्याने मोठा पेच प्रसंग तहसील कार्यालय परिसरात निर्माण झाल्याने सदर विषय तालुक्यात खमंग चर्चेचा झाला आहे.

वाहक म्हणून कार्यरत योगेश्वर तलमले हा व्यक्ती वाहन क्रमांक नसलेला वाहन चेसिस क्रमांक MBNBT53AALCG 20946 अर्हेर घाटावरून अवैध रेती तस्करी करीत असल्याने या वाहणावर महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966/48 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करत तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी कारवाई केली आहे अर्हेर नवरगाव रेती घाटावर राजकीय जनप्रतिनिधी स्व:हितासाठी अवैध रेती तस्करी करीत असल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत काय कारवाई होणार...? अथवा त्या राजकीय पक्षाचे तस्करीला समर्थन आहे का..?हे पाहणे आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment