Ads

नागरिकांच्या मागण्या गंभीरपणे सोडविण्यात येईल : राजेश गार्गे हच आर हेड

लॉयड्स मेटल्स विरोधातील मोर्च्यात युवक - महिलांचा लक्षणीय सहभाग
घुग्घुस : आज गुरुवारी काँग्रेस पक्षाचा मोर्चा लॉयड्स मेंटल्स  Lloyd metal's company कंपनी च्या गेटवर पोहचताच संतप्त मोर्चेकऱ्यांनी कंपनी प्रशासकांच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या.
"कंपनी के दलालो को जुते मारो सालो को" लॉयड्स मेंटल्स प्रशासन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी कंपनीच्या मेन गेटवर कंपनीचे एच आर मॅनेजर राजेश गार्गे, ठाणेदार राहुल गांगुर्डे व सुरक्षा रक्षक आणि दंगा नियंत्रण पथक उपस्थित होते.


मोर्चेकऱ्यांनी कंपनीच्या आत जाण्यास मनाई करीत सर्व जनते समोरच आम्हाला बोलायचे आहे ही भूमिका घेतली असता कंपनी अधिकाऱ्यांनी सर्वा समक्ष निवेदन घेऊन संपूर्ण मागण्या वरिष्ठांन पुढे ठेवून समस्या मार्गी लावू स्थानिकांनाच रोजगारात प्राधान्य देऊ व शक्य तितक्या लवकर प्रदूषण नियंत्रणासाठी गंभीर अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले.


मात्र संतप्त मोर्चेकऱ्यांनी मुख्य अधिकारी प्रशांत पुरी हे आल्या शिवाय मोर्चा रद्द करणार नाही अशी भूमिका घेतली असता ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी मध्यस्थी करून आपण मोर्चा स्थगित करावा अशी विनंती केली असता मोर्चा मागे घेण्यात आला.


लोयडस मेटल्सच्या अधिकाऱ्यांना सर्व जनतेपुढे विचारणा करण्यात आली की तुमच्या कंपनीत काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांचा ठेका चालतो काय ? यावर कंपनी अधिकाऱ्यांनी सर्वांसमक्ष नाही असे उत्तर दिले.

मागील दोन दिवसांपासून कंपनीत कार्यरत कामगार अशपाक शेख व लॉयड्स संघर्ष कामगार संघटनेचा नेता दोन दिवसांपासून खोटे आरोप समाज माध्यमावर करत होता. त्याला घेऊन व मोर्च्याला विरोध करणाऱ्यांना घेऊन मोर्चेकऱ्यांन मध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे दिसत होते.

सदर मोर्चा घुग्घुस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर, युवक नेते सूरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला - युवक व गावातील नागरिकांचा पायदळ मोर्चा आज गांधी चौक घुग्घुस येथून दुपारी बारा वाजता मुख्य मार्गाने घोषणा देत लोयडस गेटवर धडकला यावेळी आंदोलनकर्ते महिला व युवक प्रचंड आक्रोशीत झाले.

लोयडस मेंटल्स कंपनी ज्याठिकाणी निर्माण झाली तेथील वस्ती कंपनीने दत्तक घेऊन वाऱ्यावर सोडल्याने शांतीनगर येथील महिला खूप चिडून होत्या.
मोर्चेकऱ्यांना भेटण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याने उपस्थित कंपनी अधिकाऱ्यांची मोर्चेकऱ्यांना उत्तर देतांना भंबेरी उडाली.

याप्रसंगी महिला नेत्यां सौ. संगीता किशोर बोबडे,सौ.निर्मला ताई जोगी, सौ. पुष्पा नक्षिणे, सौ.पदमा त्रिवेणी, श्रीमती अमिना बेगम,श्रीमती दुर्गा पाटील,श्रीमती संध्या मंडल, सौ. मंगला बुरांडे,सौ.रेखा रेगुंडवार,राजिया शेख, सौ. सरिता गौरकार ,शामरावजी बोबडे, अनिल मोरपाका,शेखशमीउद्दीन,तिरुपती महाकाली, स्टिवन गुंडेटी, श्रीहरी शेंगारप, अलीम शेख, येल्लारेड्डी, ओदेल राईपल्ली, सैय्यद रियाज, भारत राखुंडे, सुनील मादर, भैय्या भाई, किशोर बोबडे,विजय माटला, थॉमस अर्नाकोंडा, अनुप भंडारी, आकाश चिलका, रफिक शेख, बल्ली भाई, देव भंडारी,साहिल सैय्यद, शफी शेख, दीपक पेंदोर, कोंडय्या तलारी, मोसीम शेख,राकेश खोब्रागडे, विशाल नागपुरे,सचिन नागपुरे, व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मोर्च्याच्या यशस्वीते करिता रोशन दंतालवार,नुरुल सिद्दिकी,इर्शाद कुरेशी, विशाल मादर, रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,सचिन कोंडावार, जुबेर शेख, सुकुमार गुंडेटी, सुनील पाटील, आरिफ शेख, अय्यूब कुरेशी, अंकुश सपाटे,रंजित राखुंडे, कुमार रूद्रारप, प्रतीक रामटेके, प्रदीप आसेकर, कपिल गोगला, विजय रेड्डी, राहुल पंधरे, वस्सी शेख, अम्मू कुरेशी, शाहरुख शेख, प्रवीण कांबळे, सतीश गोदारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment