चंद्रपूर : आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी लोककलेला व्यापक स्वरूप मिळावे, तसेच मुस्लीम समाजाला देखील हक्काची जागा प्राप्त व्हावी याकरिता खासदार बाळू धानोरकर व प्रतिभाताई धानोरकर यांनी आज वरोरा शहरातील भाजी बाजार परिसरात आदिवासी व मुस्लिम समाज भवनाचे भूमिपूजन केले. शहरातील आदिवासी व मुस्लिम समाज बांधव मागील कित्येक दशकापासून समाज भवन बांधकामाची मागणी पूर्ण झाली आहे.
येथे सामूहिक लग्न, परंपरागत सण उत्सव, आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याचा दृष्टीने जागा उपलब्ध नसते. परंतु या समाज भावनांमुळे त्यांना हक्काची जागा मिळणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर तर भूमिपूजन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अह ते शाम अली, नगरसेवक गजानन मेश्राम, नगरसेवक राजू महाजन, अनिल झोटिंग, छोटू शेख, काँग्रेसचे जेष्ठ नेते विलास टिपले, मनोहर स्वामी, ज्येष्ठ नागरिक शाबान भाई यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. समाज भवन बांधकामावर एक कोटी रुपये खर्च करून सर्व सोयीयुक्त बांधकाम करणार आहेत. दोन्ही समाज भवन ला सुरक्षाभिंत असणार आहे. शहरातील आदिवासी व मुस्लिम बांधव समाज भवन झाले पाहिजे याकरिता कित्येक वर्षापासून प्रयत्न करीत होते. आज दोन्ही समाज भवनाचे भूमिपूजन झाल्याने खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिलेला शब्द पाळला, अशा प्रतिक्रिया आदिवासी व मुस्लिम समाज बांधव व्यक्त करीत होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते
0 comments:
Post a Comment