Ads

शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याचा आय.एम.ए चा मानस:-डॉ.मंगेश गुलवाडे


चंद्रपुर :-दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य मिळावे हा सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर तथा उपपोलिस स्टेशन पाटण व पिट्टीगुडा यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी कला महाविद्यालय पाटण ता.जिवती येथे निःशुल्क आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत हॊते त्यांनी यावेळी सांगितले की दुर्गम भागामध्ये शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याचा मानस इंडियन मेडिकल असोसिएशनचा असून नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी सतत असोसिएशनच्या माध्यमातून वैद्यकीय चमू प्रयत्न करत राहील असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,गडचांदुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक,पोलीस उपअधीक्षक(गृह) अपर्णा मराठे,डॉ.बालमुकुंद पालीवाल,डॉ.प्रीती उराडे,डॉ.प्रीती चव्हाण,डॉ.पल्लवी इंगळे,डॉ.राजेश कत्वारे,डॉ.डोके,डॉ.स्नेहा वाघमारे, डॉ.कविता शर्मा,पाटण उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मडावी,पिट्टीगुडाचे पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष रोटे.श्रीकांत रेशीमवाले,सचिव रोटे अविनाश उत्तरवार,नवनिर्वाचित अध्यक्ष रोटे अजय जैस्वाल,रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे सचिव अमोल पोटूडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर आरोग्य रोगनिदान शिबीरात 665 नागरिकांनी लाभ घेतला...

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment