Ads

गोंडवाना विद्यापीठाची हिवाळी-२०२१ परीक्षा ऑनलाइन पध्दतीनेच व्हावी,यंग थिंकर्स चंद्रपुर एन.बी.एस.एस तर्फे मा.कुलगुरु यांना मागणी.

Gondwana University's Winter-2021 examination should be conducted online only, Young Thinkers Chandrapur NBSS demands Hon'ble Vice Chancellor.
चंद्रपुर :- गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२१ हि परीक्षा जानेवारी महिन्यापासून ऑफलाइन पध्दतीने होईल असे जाहिर केले आहे.विद्यापीठातुन सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिक्षण प्रणाली अनेक दिवसांपासून आभासी पध्दतीने सुरु आहे.महाविद्यालय स्तरावर अभ्यासक्रम व शिकवनी हि सम्पूर्णपणे आभासी (ऑनलाइन) पध्दतीने सुरु आहे.यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुद्धा ऑनलाइन पध्दतीनेच होईल अशी आशा विद्यार्थ्यांना व पालक वर्गाला होती.कारण,विद्यापीठात शिकणारा बहुतांश विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातील आहे.या सोबतच विद्यापीठात जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील विद्यार्थी वर्ग सुद्धा शिक्षण घेत आहे.ऑफलाइन पध्दतीने परीक्षा झाल्यास ह्या सर्व विद्यार्थ्यांपुढे प्रवास करणे व वाढते प्रवासी भाडे,बससेवा बंद,वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा,होस्टल व्यवस्था ठप्प,मेस व्यवस्था ठप्प,आर्थिक नियोजन,निवासस्थान व्यवस्था करणे,कोविडचा-१९ धोका अश्या अनेक समस्यांना समोर जावे लागेल असे मत यंग थिंकर्स चंद्रपुरने मा.कुलगुरु साहेब यांच्या पुढे मांडले.विद्यार्थ्यांच्या पुढे उद्भवणाऱ्या या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने ऑफलाइन पध्दतीने होणारी हिवाळी-२०२१ परीक्षा हा निर्णय मागे घेऊन हिवाळी-२०२१ हि परीक्षा ऑनलाइन पध्दतीनेच घ्यावी या मागणीसह सर्व विद्यार्थी वर्ग यांच्यावतीने यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे दिनांक १२ डिसेंबर रोजी मा.कुलगुरु साहेब यांना निवेदन देण्यात आले.आम्ही योग्य चर्चा करून लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन मा.कुलगुरु साहेबांनी दिले.याप्रसंगी प्रामुख्याने निशिकांत आष्टनकर,शुभम निंबाळकर,आकाश वानखेडे, खेमराज भलवे,तुषार लाकडे,मिनल मोदी,सुमेधा वैद्य,रेणु आदेकर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment