चंद्रपुर :- वाढत्या तंत्रज्ञामूळे अनेक कलांसह हस्तकलाही लुप्त होत चालली आहे. याचा थेट संबध रोजगारावरही पडत असून स्वयंरोजगार देणारी ही कला भविष्यात पूर्णत: संपुष्टात येण्याची भितीही आता निर्माण झाली आहे. त्यामूळे स्थानिक पातळीवर हस्त कलेच्या माध्यमातून लघूउद्योगांचे पुन:र्जीवन करणे गरजेचे असून हस्तकलेला जिवंत ठेवण्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम नियमीत घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
वस्त्र मंत्रालय भारत सरकाद्वारा भारतीय हस्तशिल्प विभागातर्फे आज सोमवारी कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, हस्तकला विभागाचे सह संचालक चंद्रशेखर सिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग आॅफिसर प्रतिम पूराडी यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, जे विचार शब्दांत सांगता व मांडता येत नाहीत ते अनेकदा कलेच्या माध्यमातूर व्यक्त करणे अधिक परिणामकारक ठरते. त्यामूळे जग पूढे जात असले तरी मानवी कलेची प्रचिती आजही मोठीच आहे. मात्र आता याचा स्वयंरोजगारासाठी उपयोग कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी हस्तकलांना आश्रय न मिळाल्यामुळे त्यापैकी काही कला काळाआड झाल्या आहेत. त्या हस्तकलांना संरक्षण देत त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी कौशल्य विकासाचे असे आयोजन मोठ्या स्थरावर आयोजीत केल्या गेले पाहिजे. यात लोकप्रतीनिधी म्हणून लागणारी शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आजच्या या आयोजनात प्रशिक्षणार्थींची संख्या फार कमी आहे. ती वाढवीण्याच्या दिशेनेही संबधित विभागाने प्रयत्न करावेत. तसेच हस्त कलेतून तयार करण्यात आलेल्या वस्तंुच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठही उपलब्ध करुन दिल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर हे सदैव हस्तकला आणि विविध कलांना योग्य वावगून देणारा जिल्हा आहे. देश पारतंत्र्यात असताना गांधी सेवा संघाचे दुसरे वार्षिक अधिवेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या गावी पार पडले होते. या अधिवेशनाच्या स्थळी हस्तोद्योगाचे एक छोटेखानी प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले होते.
आर्थिक स्वावलंबन व स्वयंपूर्णता यांवर आधारित व हस्तकला आणि उद्योग यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या कार्यक्रमांना विशेष महत्व दिल्या गेले पाहिजे असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या प्रदर्शनीचीही याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहनी करत या प्रदर्शनीतील प्रत्येक वस्तू हस्तकलेचा उत्तम नमूना असल्याचे ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थीची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment