धूळ नियंत्रणा करिता पाणी मारा
अन्यथा रस्ता बंद पाडू : वेकोलीला काँग्रेसचा इशारा
घुग्घुस : वेकोलीच्या खाणीतुन कोळसा भरलेल्या जडवाहतुकीमूळे बस स्थानक ते महातारदेवी रोडवर धुळामुळे चालणे ही शक्य नाही.
धुळामूळे परिसरातील घर व दुकानाचे अत्यंत दुर्दशा झालेली आहे.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावर पाणी मारले जात होते.
मात्र आता पाणी मारणे बंद केल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.
यासंदर्भातील तक्रार काँग्रेस कार्यलयात पोहचताच काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी सब एरिया मॅनेजर फुलारे यांची भेट घेऊन जर तातळीने पाणी मारण्यास शुरू न झाल्यास पूर्ण रस्ताच बंद करू असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
सदर रस्त्यावर तातळीने पाणी मारण्यास शुरू करण्याचे आदेश वेकोली अधिकारी फुलारे यांनी दिले आहे.
यासह वेकोली वसाहत परिसरात कचराकुंडी लावण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.
त्याचे ही टेंडर पास झाले आहे.
तसेच शिवनगर येथील मुख्य मार्ग व झाडसफाईचे कामांचा टेंडर ही लवकरच होणार असल्याची माहिती वेकोली अधिकाऱ्यांनी दिले आहे.
0 comments:
Post a Comment