Ads

उपविभागीय पोलीस अधीकारी, चंद्रपुर यांची जुगार अड्डयावर धाड


Sub-Divisional Police Officer, Chandrapur raids gambling den
दुर्गापूर / चंद्रपुर :- दुर्गापूर परिसरात सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांनी छापा टाकुन १८ जणांना ताब्यात घेतले आहे. १८ आरोपींकडुन ३ लाख ३४ हजार ५२६ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांनी केली आहे. या प्रकरणी १८ जणांविरुध्द दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

दुर्गापुर हद्दीतील आंबेडकर चौकातील खानदे यांचे दुकानाचे मागील भागातील उत्तरवार यांचे दुकानाचे चाळीमधील दुकानात सट्टापट्टीवर पैसे लाऊन, जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांना प्राप्त झाली. त्यावरुन सदर ठिकाणी श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांनी स्टाफसह छापा मारला.

यावेळी सटीपट्टी चालविणाऱ्यासह एकुण १८ इसम जुगार खेळतांना मिळुन आले. सदर इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. १८ इसमांच्या अंगझडतीत रोख रक्कम व इतर साहीत्य ३,३४,५२६ /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असा एकुण

सदरची कारवाई मा. श्री. अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक चंद्रपुर व मा.श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील पोलीस स्टॉप स.फौ. राजेश चुचूलवार, पो. हेड कॉ. किसन राठोड, पोलीस अमलदार शितल बोरकर, मनोज चालखुरे, पुर्वेश महात्मे, आदेश रामटेके, जगदीश जिवतोडे व अमरदिप आवळे यांचेसह करण्यात आलेली असुन एकुण १८ आरोपींविरुध्द कलम ४.५ महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे दुर्गापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment