Ads

आम्ही बोलतो ते करतोच, एकदा सत्ता द्या कायापालट करून दाखवू-माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

We are doing what we say, once you give power, we will transform it - Former Minister Sudhir Mungantiwar
सावली प्रतीनीधी:-
आम्ही जे आश्वासन देतो, निवडणूक प्रचार सभा मध्ये जे बोलतो ते करून दाखवतो, फक्त निवडणुकीत आश्वासन द्यायला येत नाही तर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी जीवाचे रान करतो असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ते सावली नगर पंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रचार सभेत बोलत होते, गुजरी चौकातील नगर पंचायतीच्या समोर झालेल्या या सभेत खासदार अशोकजी नेते, आमदार बंटीभाऊ भांगडीया, माजी आमदार प्रा.अतुलजी देशकर,भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, मुल नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सुहास अलमस्त, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल,जिप सदस्य संतोष तंगडपल्लीवार,उपसभापती रवींद्र बोलीवार,माजी सभापती छाया ताई शेंडे, प्रकाश पा.गड्डमवार, अशोक आकुलवार, प्रकाश खजांची ,प्रवीण सुरमवार तसेच नगर पंचायत साठी उभे असलेले भाजप चे सर्व उमेदवार तसेच स्थानिक नेते उपस्थित होते.

या प्रसंगी मुनगंटीवार यांनी उपस्थित जनतेला पाणी, वीज , रस्ते , नाल्या या मूलभूत सुविधा त्याचप्रमाणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याणसाठी अभ्यासिका, वाचनालय अश्या विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी जीवाचे रान करेल, मी अर्थमंत्री होतो राज्याच्या तिजोरीच्या चाब्या कुठे असतात, त्याची चाबी कशी खुलते याची मला संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमच्या सावलीला मुल, पोंभुरणा सारख बनवून दाखवेल असे प्रतिपादन करत एकदा सत्ता देण्याचे आवाहन केले.

त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र शासनावर सडकून टीका करत हे तीन तिघाडी बिघाडीच सरकार आहे यांना दारूवर 50 टक्के सुबसिडी देता येते पण शेतकऱयांना मदत करता येत नाही, परीक्षांमध्ये घोटाळे, प्रत्येक जागी घोटाळे करत हे घोटाळ्याचे सरकार म्हणून पुढे येत आहे,असे म्हटले.

तर चिमूर चे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी स्थानिक आमदारांवर टीका करत यांना विकास कामांसाठी काहीही देणं घेणं नाही फक्त दारूच्या विषयांवर ते काम करत असल्याचे बोलले, त्यांनी या पूर्वीच्या नगर पंचायत च्या सत्तेत काय दिवे लावले आहेत यावरही प्रश्न उपस्थित केले.

खासदार अशोक नेते यांनी सावली शहराच्या मध्य भागातून गेला नॅशनल हाय वे हा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातून झाल्याची आठवण करून दिली, माजी आमदार अतुल देशकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

प्रसंगी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.कार्यक्रम चे संचालन कृष्णा राऊत यांनी केले तर आभार अविनाश पाल यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment