Ads

विवेकानंद महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा .

Minority Rights Day celebrated at Vivekananda College
भद्रावती : अल्पसंख्यांकांशिवाय लोकशाही असूच शकत नाही. जिथे लोकशाही नाही तिथे अल्पसंख्यांकाचा प्रश्नच उद्भवत नाही. भारत हा सुसंस्कृत देश आहे. या महान संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणजे विविधता स्वीकारण्याच्या तिचा स्वभाव. यामुळेच भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठरले आहे असे विचार प्रा. मोहित सावे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील अल्पसंख्यांक हक्क दिवस या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. अध्यक्षीय स्थानावरून बोलताना डॉ. उमाटे म्हणाले की, जाती धर्माच्या नावाने तिरस्कार न पेरता सगळ्यांशी धर्मनिरपेक्ष भावनेने वागावे. आम्ही सर्व एक आहोत या भावनेने वागले पाहिजे. जिथे विषमता तिथे प्रगती होणार नाही असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बंडू जांभुळकर संचालन डॉ. रमेश पारेलवार, आभार डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. या कार्यक्रमात डॉ प्रकाश तितरे, डॉ. विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ. गजानन खामनकर, डॉ.जयवंत काकडे, डॉ. सुहास तेलंग, प्रा. अमोल ठाकरे,डॉ, यशवंत घुमे,प्रा.नरेंद्र लांबट यांच्यासह विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment