चंद्रपुर :- कामगारांप्रती अनेक आस्थापणांची भुमिका ही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कामागारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला योग्य वेळेत दिला गेला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिल्या गेले पाहिजे, कामगारांची पिळवणूक खपवून घेऊ नका अशा आस्थापणांवर तात्काळ कार्यवाही करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त जाणकी भोईत यांना केल्या आहे.
कामगारांच्या विविध समस्यांना घेऊन आज शासकीय विश्राम गृहात आमदार किशोर जोरगेवार यांनीसहाय्यक कामगार आयुक्त जाणकी भोईत, यांच्या सह संबधित अधिका-र्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त जाणकी भोईत, सरकारी कामगार अधिकारी छाया नान्हे, यंग चांदा ब्रिगेडच्या कामगार विभागाचे रुपेश झाडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अॅड. राम मेंढे, बाळकृष्ण जुवार, अल्पसंख्यांक विभागाचे युवा शहर युवा प्रमूख राशिद हुसेन, गौरव जोरगेवर, समिर खान पठाण, राजेश गायकवाड, बापूसाहेब जावडे, एकनाथ झाडे आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. येथे कुशल अकुल कामगारांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणात कारखाने आणि आस्थापने असल्याने येथे कामगार सुरक्षा मंडळाची जबाबदारी अधिक आहे. येथील विविध आस्थापनात काम करत असलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या दिशेन संबंधित विभागाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे, कामगारांना न्याय देण्याची भुमिका या विभागाची असली पाहिजे असा सुचनाही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिल्या आहे.
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदित १०३ सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर रुजू करण्यात यावे, अतिशय किचकट असलेली सुरक्षा रक्षक मंडळाची नोंदणी प्रक्रिया सरळ करण्यात यावी, कंपन्यातर्फे किमान वेतन अधिनियामचे उल्लंघन करून कामगारांना कमी वेतन दिला जात आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, मुख्य नियुक्ता कंपनी आणि कंत्राटदार कंपन्यातर्फे कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामगारांसोबत कंत्राट केला जातो. त्यामुळे कुठल्या अटी व शर्ती वर कामगारांना कामावर घेतल्या जाते याची माहिती नसते. याकडे लक्ष देण्यात यावे, कंपन्यामधील कंत्राटी कामगारांना नियमित २६ दिवस काम देण्यात यावे, मुख्य नियोक्ता कंपन्यांतर्फे कामगारांना सानुग्रह अनुदान जाहीर झालेले असतांना कंत्राटदारांनाकडून कामगारांना बोनस दिला जात नाही. अशा कंत्राटदारांवर कार्यवाही करण्यात यावी, कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, महानगरपालिका क्षेत्रातील कंपन्यांच्या वर्गवारी अ, ब आणि क नुसार कामगारांचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल श्रेणीनुसार किमान वेतन अधिनियम नुसार वेतन व भत्ते देण्यात यावे, जिल्ह्यातील सर्व उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्याने नोकरी देण्यात यावी. आदि सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना केल्या आहे.
0 comments:
Post a Comment