भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती शहरात एका घरात आढळून आलेल्या घोरपडी monitor lizard ला वन्यजीव रक्षकांनी पकडून निसर्ग सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुधोली येथील पटवारी कपील सोनकांबळे यांच्या भद्रावती येथील राहत्या घरात घोरपड आढळून आली. त्यावेळी त्यांनी वन्यजीव रक्षक श्रीपाद बाकरे यांना माहिती दिली. बाकरे यांनी कसलाही विलंब न करता तातडीने सोनकांबळे यांच्या घरी धाव घेतली. तिला रीतसर पकडून वनविभागात नोंद करून वनविभागाच्या साहाय्याने निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. यावेळी केतन ताठे, युगल ठेंगे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment