चिमूर :- पैशाच्या वादावरून माधव प्रकाश सोनवाने ३० वर्ष व नरेश गणपत श्रीरामे २० वर्ष रा तळोधी (नाईक) यांच्यात भांडन होत असताना भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले नरेश श्रीरामे यांनी चाकू ने हल्ला करत माधव सोनवाने यांना गंभीर जखमी केले ही घटना सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली दोघेही साले भाटवे असल्याचे समजते. दरम्यान आरोपी श्रीरामे यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला आल सर्मपण केले.
तळोधी नाईक येथील ग्राम पंचायत सदस्य शीतल माधव सोनवाने यांचे पती माधव सोनवाने असून त्यांचा चुलत साळा नरेश श्रीरामे यांच्यात आर्थिक व्यवहार संदर्भात शाब्दिक बाचाबाची झाली असता भरदिवसा रागाच्या भरात नरेश श्रीरामे याने माधव सोनवाने वर चाकू ने पोटावर व गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले यामध्ये माधव सोनवाने यांचे वडील मध्यस्ती करण्यासाठी आले असता प्रकाश सोनवाने यांना सुध्दा दुखापत झाली असल्याचे कळते चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करन्यात आला यापूर्वी सुद्धा तळोधी नाईक येथे वर्षांपूर्वी सुद्धा भरचौकात सहकार नेते सुरेश पाटील दहिकर यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती जखमी ला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले होते मात्र माधव सोनवाने यांना गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले चिमूरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सरवदे पुढील तपास करीत आहे.
0 comments:
Post a Comment