घुग्घुस :- 08 जानेवरी रोजी स्नेहा फूड कंपनीत करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुण कुमार सैनी याचा मृत्यू झाला मृतकाला पन्नास लाख मोबदला व कंपनी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर घुग्गूस पोलीस स्टेशनला निवेदन देऊन स्नेहा फूड कंपनीला घेराव टाकला.
चंद्रपूर महामार्गावरील अंतुरला गावालगतच्या स्नेहा फूड या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा केला आहे.
या कंपनीत एकशे अंशी कामगार असून यात स्थानिक कामगारांची संख्या केवळ साठ असून एकशे वीस परप्रांतीय कामगार आहे.
परप्रांतीय कामगार मेले तरी गुपचूप रित्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हे कंपनी परप्रांतीयाना रोजगार देत असते.
दिनांक 08 जानेवारी रोजी कंपनीत कार्यरत कर्मचारी बिहार निवासी हरगुण कुमार सैनी या तीस वर्षीय युवकांचा करंट लागून मृत्यू झाला.
या मजुराला मानवीय दृष्टीकोनातून मदद करायला पाहिजे होती मात्र या मजुरांच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला या घटनेचा निषेध करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कंपनीला
घेराव घातला.
संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी कंपनी अधिकारी सागर तांडरा यांनी चर्चा केली.
व मृतक कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्याचे मान्य केले
मात्र काँग्रेस नेत्यांनी मृतक कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची मागणी धरून लावली मृतक कुटुंबियांना मोबदला व अधिकाऱ्यांन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने दिला आहे.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर,थॉमस अर्नाकोंडा,रोशन दंतालवार, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment