भद्रावती तालुका प्रतिनिधी :-श्री गुरुदेव सेवा मंडळ,भद्रावतीचे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५३ वा पुण्यतिथी महोत्सव विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाने लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
याप्रसंगी 'राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धा' तसेच निराधारांना सहायता मदत करण्यात येऊन दिवंगत कार्यकर्त्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली तसेच गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा मंच भद्रावतीचे वतीने शेतकरी आत्महत्येवर आधारीत ग्रामगीता प्रणीत ग्रामनाथ.....विश्वाचे अधिष्ठान हि नाटीका सादर करण्यात आली.
श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अरविंदजी राठोड व गोपालजी कडु गुरुकुंज आश्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा परिसंवाद घेण्यात आला व यामध्ये २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ग्रामगीतेतील अध्याय ' ग्रामरक्षण ' व ' सणोत्सव ' यावर आपले विचार प्रकट केले. कार्यक्रम प्रसंगी झालेल्या भजन संमेलनात १५ भजन मंडळाने भजन सेवा सादर केली व श्रीजय चव्हाण व संच यांनी राष्ट्रसंताची खंजेडी भजने व खंजेडी जुगलबंदीचा कार्यक्रम सादर केला. सौ. बेबीताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन संपन्न झाले. हभप स्नेहगंगाश्रीजी श्रुंगारे यांचे कीर्तनाने संमेलनाची सुरुवात होऊन कार्यक्रम प्रसंगी निर्मलाताई खडतकर , कविताताई येणुरकर, अँड सारीका जेनेकर , पोउपनि अश्विनी वाकडे, ज्योतीताई लालसरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उर्मिलाताई बोंडे व आभार सोनालीताई गावंडे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी झालेल्या किर्तनात हभप मनोज महाराज चौबे व तुषार सुर्यवंशी यांनी सेवा सादर केली.
कार्यक्रमप्रसंगी सुरक्षा नगर परिसरात रामधून काढण्यात येऊन यानिमित्ताने परिसरात साफसफाई करून मार्गावर राष्ट्रसंतांच्या प्रतिमा व रांगोळ्याने मार्ग सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी गोपाल गायकवाड यांनी रामधुनच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले तसेच सामुदायिक ध्यान व प्रार्थनेच्या महत्त्वावर अशोकजी चरडे सर व संकेतजी काळे यांनी चिंतन प्रकट केले . हभप प्रशांत महाराज ठाकरे यांनी गोपाल काल्याचे किर्तन सादर केले. याप्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, हंसराजभैय्या अहीर, लक्ष्मणराव गमे, सेवकरामजी मिलमिले, रुपलाल कावळे यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्कृती संवर्धन व आदर्श पिढी घडविण्याच्या हेतूने मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या बाल सुसंस्कार व प्रचार प्रशिक्षण शिबिरा करिता 'शाश्वत निधी योजनेत' गजानन डंबारे यांनी रुपये १० हजाराचा संकल्प केला. कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते शोभाताई खडसे, पुरुषोत्तम मत्ते, शालीक दानव, चंद्रभागा मत्ते, श्रीराम राऊत, रामकृष्ण कुबडेे, अविनाश शेडीमे, शालीनी पचारे यांना राष्ट्रसंत सेवा गौरव पुरस्काराने सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यतिथी महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या 'राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेत' पहिल्या गटात पहल अमोल पाटील, शगुन श्रीकांत दाते, आराध्या मासीरकर , दुसऱ्या गटात पर्णवी सुनिल भाले, अनुष्का शरद भावे, ईशिका शेळके तिसर्या गटात नेहा प्रसाद, सांची गणविर, श्रावणी शिवरकर यांनी क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण शालीक दानव, क्षितीज शिवरकर, विनोद ठमके सर व गजबी सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केशवानंद मेश्राम, चंद्रकांत गुंडावार, मुरलीधर मेश्राम, गोपीचंद मेश्राम, झनक चौधरी, बालाजी नागपुरे, गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, मारोती कोरेवार, नरेंद्र मेश्राम, कालीदास चेडे, तुकाराम उमाटे, खुशाल कंचनवार, रविश मुरकुटे, अशोक गौरकार, भुजंगराव खानोरकर, विवेक महाकाळकर, निलिमाताई वासेकर, आशाताई शेंडे, गजानन ढेंगळे, बाबाराव नागोसे, बाबाराव तेलरांधे, रमेश धाबेकर, सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर, उषाताई आखाडे यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment