भद्रावती : आज दिनांक ०६ जानेवारी २०२२ ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भद्रावती येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भद्रावती तालुक्यातील शेतकरी यांची सभा पार पडली.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना शेतातील ताजा भाजीपाला धान्य हे वाजवी दरात मिळाले पाहिजे याकरिता पिकेल ते विकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 पासून दुपारी तीन वाजता होणार आहे.
शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विकता यावा यासाठी नगरपालिका भद्रावती चे मा. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर साहेब आणि मा. नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर यांनी नगर परिषद क्षेत्रातील बाजार वार्ड येथील बगडे वाडीतील आठवडी बाजाराच्या बाजूला असलेली ओपन स्पेस मैदानाची जागा निश्चित करून दिली आहे.
आजच्या सभेला तालुका कृषी अधिकारी भद्रावती कुमारी मोहिनी जाधव, मंडळ कृषी अधिकारी पी. जी. कोमटी, (चंदनखेडा), मंडळ कृषी अधिकारी मू.बी. झाडे (भद्रावती), सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन एस. सी. हिवसे, (भद्रावती), ग्राहक पंचायत भद्रावती चे पुरुषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे आणि प्रवीण रामचंद्र चिमुरकर यांची उपस्थिती होती.
सभेला भद्रावती तालुक्यातील चिरादेवी, गवराळा, जेना, घोनाड, मुर्सा, पिरली, पिपरी, चपराळा, नंदोरी, वायगाव, मांगली, विसापूर, कोंढा, काटवल, मुधोली, भद्रावती येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती, ग्राहक पंचायत भद्रावती, शेतकरी यांच्याकडून भद्रावती शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, भाजीपाला, धान्य हे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून अन्नदात्याला सहकार्य करावे.
0 comments:
Post a Comment