घुग्घुस :-शहरातील राजीव रतन चौक ते म्हातारदेवी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवघेणे खड्डे पडलेले आहे. परंतु इथल्या स्थानिय नागरिकांकडून वारंवार निवेदन देऊन सुद्धा याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याच मार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची जड वाहतूक होत असल्यामुळे तिथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्या मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, नगरपरिषद कार्यालय घुग्घूस, इथे निवेदन देण्यात आले, येत्या १५ दिवसांमध्ये हे खड्डे बुजविण्याचे आले नाही तर आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली उपस्थित होते.
Home
Uncategories
राजीव रतन चौक ते म्हातारदेवी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू - आम आदमी पार्टी
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment