ब्रम्हपुरी (तालुका प्रतिनिधी) :- मृतक पीडित पत्नीसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती नामे रवींद्र मुर्लीधर पारधी वय:- ३९ वर्षे राह. मालडोंगरी यास पोलिसांनी दिनांक १०/१/२०२२ रोजी अटक करून त्याच्याविरुद्ध अप.क्र १७ /२०२२ नुसार भांदवी कलम ३०६,४९८(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पतीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे हे स्वतः करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment