चंद्रपूर : लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी काँग्रेसचा विचार अत्यंत महत्त्वाचा असून तरुणांनी ही जबाबदारी खांद्यावर पेलत पक्षासाठी काम करावे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्याला प्रेरित होऊन वरोरा तालुक्यातील चीनोरा येथील शेकडो युवकांनी वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, कृषी बाजार समिती सभापती राजू चिकटे, सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव, सरपंच यशोदा कमनकर यांची उपस्थिती होती.
यावेळी त्रिशूल निबूदे, हेमंत ढेंगळे, विकास देठे, राजू धानोरकर, सचिन मोहितकर, संतोष हारणारे, सुमित हक्के, सुनील गोसरे, अमित काठवते, गजानन भोयर, शरद भोयर, स्वप्नील विधाते, मुरलीधर उईके, रवींद्र शेरकुरे, विशाल मोहुरकर, विनोद हरणारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, या सात वर्षात देशातील शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्गासह सर्वच घटक असमाधानी असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यापासून देशात सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. गॅसचे वाढते भाव माय बहिणीच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. देशातील नागरिकांना आता केंद्र शासन चालविणाऱ्या गुजरातच्या जोडीची वास्तवता लक्षात आली आहे. मोदी सरकारचे हे साडेसात वर्ष जणू महागाईची साडेसाती असल्याची खोचक टीका आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
0 comments:
Post a Comment