Ads

तब्बल सव्वा महिन्याने मनसेचे वैभव डहाने आणि राहुल खारकर यांना अटक

MNS's Vaibhav Dahane and Rahul Kharkar arrested after37 days
वरोरा(प्रती):-मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच दि,४/१२/२०२१रोजी वरोरा नगर परिषदच्या स्थापत्य अभियंत्यास रस्त्याची पाहणी करतांना मारहाण करण्यात आली होती. वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता, परंतू त्या गुन्हेगाराना अटक झाली नव्हती,दोन्ही आरोपी भूमिगत झाले होते.तब्बल३७दिवसांनी म्हणजेच सव्वा महिन्याने त्या दोन आरोपींना अटक करण्यात आली,
नगर परिषद चे बांधकाम अभियंता सुरज पुनवटकर हे नगर परिषद इमारतीसमोरील रस्ता बांधकामाची पाहणी करीत असतांना वैभव डहाणे व राहुल खारकर यांनी शिविगाळ करून अभियंत्यांच्या अंगावर रसायन युक्त सिमेंट फेकल्याची घटना घडली होती, याबाबत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदविला होता, मात्र घटनेला वीस दिवस लोटून सुद्धा मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले होते, आणि २४डिसेंबर२०२१रोजी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले होते, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता,पुढील तीन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास अत्यावश्यक सेवेसह बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता, यावेळी नगराध्यक्ष अहेतेशामअली विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम भारतीय नगरपरिषद कामगार संघाचे नगरसेवक ऍड प्रदीप बुरान नगरसेवक अनिल साखरिया व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तब्बल सदर घटनेला सव्वा महिना उलटला आरोपींनी जामिनासाठी प्रयत्न केले, परंतु कोर्टाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळले, अखेर दि११/०१/२०२२रोजी दोन्ही आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली,,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment