भद्रावती : मागील काही दिवसापासून भद्रावती शहरातील मोकाट कुत्रे एका संसर्गजन्य आजाराने ग्रासलेले दिसत आहे. मात्र याकडे कोणाचे च लक्ष नाही. कुत्र्यांच्या अंगावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. तर काही कुत्र्यांच्या अंगावरचे केस गळत असून पूर्ण त्वचा मोकळी झाली आहे. काही कुत्र्यांचे कानच गळून पडले आहेत. जखमांमधून रक्त बाहेर पडताना दिसत आहे. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावून जातात, रात्री च्या सुमारास वेदनेने कुत्रे भूंकतांना, रडताना सगळीकडे दिसत आहे.
असे आजारी कुत्रे घरी पाळीव कुत्र्यांच्या संपर्कात आला तर पाळीव कुत्र्याला आजार होईलच परंतु हा त्वचेचा आजार कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या नागरिकांना होण्याची शक्यता टाळता येत नाही.
त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राहक पंचायत, भद्रावती यांनी नगर परिषद भद्रावती चे मुख्य अधिकारी सुर्यकांत पिदुरकर, भद्रावती पशुवैद्यकीय अधिकारी आणि पीपल्स फॉर ॲनिमल चे डॉ. धोंगडे यांना पत्र देऊन भद्रावती शहरातील आजारी मोकाट कुत्र्यांवर लवकरात लवकर इलाज करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना ग्राहक पंचायत, भद्रावती चे वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मत्ते प्रविण रामचंद्र चिमुरकर यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment