गडचांदूर प्रतिनिधी:-चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती नगरपंचायतचे लेखापाल सागर कुऱ्हाडे यांच्यावर 10 जानेवारी रोजी तेथील मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी न.पं.कार्यालयात अरेरावी करत लेखापाल यांच्या टेबलावर असलेला मोबाईल,लॅपटॉप व फाईल फेकुन अनपेक्षितपणे राडा केल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ गडचांदूर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 13 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून कामे केली.महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने येथील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रशासकीय अधिकारी चरणदास शेडमाके,अभियंता स्वप्नील पिदूरकर,प्रीतिष मगरे, लेखापाल मनोज कुंभारे,अमित निमकर,कपिल नल्लेवार,लिपिक संतोष गोरे,बंडू वांढरे,विशाल मंगरूळकर,सचिन खणके इत्यादींची उपस्थिती होती.
फोटो:-
0 comments:
Post a Comment