Ads

तहसीलदार विरोधात पत्रकार एकवटले

Journalists rallied against the tehsildar

उपविभागीय अधिकारी यांना ग्रामीण पत्रकार संघ,बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे निवेदन

वरोरा :- दि.12 जानेवारीला दैनिक नवजीवन चे प्रतिनिधी याच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा असंविधानिक पध्दतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटीस लावण्यात आला होता.त्यामुळे पत्रकार क्षेत्रातून तहसीलदार रोशन मकवाणे यांचा जाहीर निषेध करण्यात आला होता.त्याकरिता आज वरोऱ्यातील पत्रकार संघाकडून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देऊन तहसीलदार यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा सक्षम चौथा आधार स्तंभ असतो.समाजातील चांगल्या वाईट घटनांचा आपल्या जीवाची पर्वा न करता बातम्या शोधतो व समाजासमोर मांडतो.एक प्रकारे तो समाजाचा आरसा असतो तर याच बातम्या मुळे काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला हे सुद्धा तितकेच सत्य.वरोऱ्याच्या तहसीलदार रोशन मकवणे सुद्धा दबावतंत्राचा वापर करून पत्रकारांना धमकविण्याचा प्रकार करीत असल्याची घटना वरोऱ्यात घडली.दै. नवजीवन वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओम चावरे यांना तुम्ही माफी मागा अन्यथा तुमच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटिसच त्यांच्या घरावर लावण्याचा प्रकार तहसीलदार रोशन मकवाणे यांनी केला होता. त्यामुळे आज वरोऱ्यातील स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ,बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून तहसीलदार रोशन मकवाणे यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वरोरा तहसील कार्यालयाला लाभलेले तहसीलदार रोशन मकवाणे आपल्या प्रशासकीय कामापेक्षा अवैध गौण खनिज माफिया यांच्या वर मेहेरबान असल्याने जास्त प्रसिद्ध आहे.त्याचा खुलासा गेल्या काही दिवसांपासून दैनिक नवजीवन या वृत्तपत्रांच्या माध्यमातून होत होता.मार्डा रोडवरील गौण खनिज कारवाई असो की सुर्ला येथील माती उत्खनन प्रकरण असो यांच्यात तहसीलदार याचे ओले हात होते हे दिसून आले होते.नुकताच दि.8 जानेवारीला रात्री एक वाजेच्या दरम्यान तलाठी शरद दाते,दिलीप शेळकी व तहसीलदार यांच्या गाडी चालकाने खांबाडा गावाजवळ काळ्या रेतीने भरलेला बिगर नंबर असलेला ट्रॅक्टर पकडला. मोक्यावरची सेटींग फिस्कटल्याणे तो ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.मात्र त्या ट्रॅक्टर वर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तहसीलदार रोशन मकवाणे यांनी 80 हजार रुपये घेऊन सोडल्याची चर्चा तहसील कार्यालयात जोरदार सुरू होती.त्या संदर्भात तलाठी शरद दाते यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रॅक्टर पकडल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता.त्याचे सांगण्यावरून बातमी प्रकाशित केली असता तहसीलदार रोशन मकवाणे यांनी दैनिक नवजीवनचे प्रतिनिधी यांच्या घरावर तुम्ही दिलेल्या बातमी संदर्भात माफी मागा नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल असा चक्क नोटिसच लावण्यात आला आहे.ही एक प्रकारची दडपशाही आहे.जर तहसीलदार यांना आपले मत मांडायचे होते तर ते त्यांनी प्रसार माध्यमातून मांडायला पाहिजे होते परंतु तसे न करता त्यांनी पत्रकारांना फौजदारी गुन्हे दाखल करू अशी दमदाटी देऊन संविधानिक हक्क हिरावण्याचे कार्य केले आहे.अश्या बेबंदशाही वृत्तीला आळा बसायला पाहिजे याकरिता पत्रकार संघाकडून निवेदन देण्यात आले.उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देते वेळेस बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष घुमे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशपाक शेख,सचिव सुनील शिरसाट तसेच पत्रकार अनिल पाटील, प्रदीप कोहपरे,हितेश राजनहिरे, डॉ.मनोज तेलंग,मनोज गाठले,अतुल निब्रड,सुरज घुमे,ओम चावरे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment