नागभीड:- प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी ची रुग्णकल्याण समिती बैठक या समिती चे अध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . यात उपस्थित सदस्यांनी प्रामुख्याने परिचारीकांची नियुक्ती नसल्याने लसीकरणाचा वेग या केंद्राअंतर्गत मंदावला असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
सोबतच या केंद्रात एकही कनिष्ठ लिपिक नसल्याने कार्यालयीन कामकाजात खोळंबा होत असल्याचेही लक्षात आले . यासाठी तातडीने परिचारीका व कनिष्ठ लिपिकाचे पद भरण्यासाठी ठराव करण्यात आला व वरीष्ठांकडे याचा पाठपुरावा करावा असे ठरले. यावेळी विविध आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला व अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली .
या बैठकी चे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र , मौशी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले . बैठकीला जि.प.सदस्य तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष संजयभाऊ गजपुरे, मौशी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर माकडे , डॅा. अश्विनी रामटेके , मौशी चे सरपंच सौ. संगीता करकाडे, मेंढा ( किरमिजी ) चे सरपंच आनंदराव कोरे, समिती सदस्य अरुण मानापुरे, रामकृष्ण देशमुख, माजी सरपंच वामनराव तलमले, भीमरावजी मेश्राम यांची उपस्थिती होती.
बैठकीचे संचालन आरोग्य सहाय्यक मारोती मडावी यांनी केले तसेच आभारप्रदर्शन आरोग्य सहाय्यक अनिल रावेकर यांनी मानले. यावेळी संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment