चंद्रपुर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या पवित्र भुमितून भविष्यातील अधिकारी वर्ग घडत आहे. शिक्षणासाठी पूरक असे वातावरण या शिक्षण संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आले आहे. याचाच प्रत्यय आज पदवी वितरण कार्यक्रमात पून्हा एकदा आला असून आज पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी उद्या देशसेवेसह त्यांना या महाविद्यालयातून मिळालेला समाजसेवेचा वसा पूढे नेत समाजसेवत अग्रेसर राहून देश घडवावा असे प्रतीपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सोबतच येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे या करिता आपण येथील अभ्यासीकेसाठी 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालीत डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सत्र 2020 - 21 पदवी प्रमाणपत्र वितरण तथा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन डॉ. आंबेडकर महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दिक्षाभुमी चंद्रपूरचे सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दिक्षाभुमी चंद्रपूरचे सदस्य राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात आपले आणि आपल्या जिल्ह्याचे नाव लौकीक करत आहे. यु.पी.एस.सी. मध्येही चंद्रपूरच्या चार विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. शिक्षणाच्या कमी संसाधनातही हे विद्यार्थी प्रामाणीकतेने प्रयत्न करत यश संपादीत करत आहे. आपणही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून मतदार संघात सर्व सोयी सुविधायुक्त 11 अभ्यासीका साकारण्याचा संकल्प केला आहे. यातील पाच अभ्यासिकांचे काम युध्द पातळीवर सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले,
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे दिक्षांत समारंभ हा घेण्यात आलेला नव्हता मात्र आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आता महाविद्यालयातून पदवी प्राप्त विद्यार्थी पदवी घेऊन विविध क्षेत्रात नौकरीकरिता बाहेर पडतील. विविध क्षेत्रात कार्य करत असतांना त्यांनी समाजाच्याही हितासाठी कार्य करावे, कारण आजचा युवा हाच या देशाच्या उत्तम परिवर्तनाला साधक असल्याचे ते यावेळी म्हणाले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यानाही आवश्यक त्या सर्व पुस्तकांचे वाचण करता यावे ते पुस्तके त्यांना सहज उपलब्ध व्हावीत या करिता आपण या महाविद्यालयाला अभ्यासीका तयार करण्यासाठी 50 लक्ष रुपये निधी देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या निधीतून महाविद्यालय व्यवस्थापण उत्तम अभ्यासीका तयार करतील अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. या दिक्षांत कार्यक्रमात पदविप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले तसेच यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात सत्कारही करण्यात आला. सदर कार्यक्रमाला पदविप्राप्त आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment