चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हयात दुचाकी वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणान्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-१९८८ कलम १२९ अन्वये सगळीकडेच सक्तीचे आहे. चंद्रपूर जिल्हयात जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत दुचाकीचे एकुन ३५० अपघात झाले असून त्यात १९७ नागरिकांचा मृत्यु झाला आहे त्यापैकी १४४ दुचाकी स्वार गंभिर जखमी झाले आहेत
तरी चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उददेश अपघातामध्ये मृत्युदराचे प्रमाण कमी करणे हे आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांचे प्रमाण राज्य आणी राष्ट्रीय महामार्गावर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावर व राष्ट्रीय महामार्गावर कडक कार्यवाही करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. शहरामध्ये इतर रस्त्यावर हेल्मेटची कार्यवाही करण्यात येणार नसुन सदर आदेशाची अमलबजावणी सोमवार दि.१७/०१/२०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सर्वप्रथम पोलीस विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही सुरू करण्यात आलेली असुन त्यानंतर इतर विभागातील सरकारी अधिकारी व कर्मचारी व त्यानंतर सामान्य जनता अशी टप्प्याटप्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरीकांनी यापुढे दुचाकी चालविताना हेल्मेट परीधान करावे. चंद्रपूर जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा याबाबत जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन पोलीस निरीक्षक श्री प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment