Ads

विवेकानंद महाविद्यालयात "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" सुरू "


भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने " मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" निमित्य दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२२ दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. झूम मिटिंगवर आभासी पध्दतीने विद्यार्थी व नागरिक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत.
पत्रकार सुनील पतरंगे (भद्रावती) - मराठी युवक आणि पत्रकारिता, डॉ. सुधाकर भुयार (आर्वी)मराठी साहित्य आणि विनोद, डॉ. सुधीर भगत ((एटापल्ली) - मराठी भाषा आणि दलित साहित्य , डॉ.अनिता वाळके (मूल) मराठी आणि ग्रामीण साहित्य, डॉ.राजकुमार मुसने (आष्टी) - मराठी साहित्य आणि बोली, सौ.वनिता चल्लीरवार(चंद्रपूर) - मराठी भाषा आणि लोकगिते ,डॉ.धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी) - झाडी बोली आणि कविता, डॉ.सुदर्शन दिवसे (कोरपना) - मराठी भाषेपुढील आव्हाने, डॉ.संजय भक्ते (नागपूर) - भाषेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांमध्ये रोजगाराच्या संधी, डॉ प्रफुल्ल बनसोड (चिमूर)- व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय छात्रसेना (NCC) चे महत्व, डॉ. सुधीर मोते (भद्रावती)- मराठी साहित्य आणि म्हणी,डॉ प्रदीप चापले (कोरची) -मराठी साहित्य आणि कोवीड, धनंजय गुंडावार (भद्रावती)- मराठी तरुण उद्योगात मागे का?, प्रा. माधव कांडनगिरे (घुग्घुस)- मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा, डॉ. इंद्रजीत ओरके (नागपूर)- मराठी साहित्य आणि संस्कृती इत्यादी तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.कृपया इच्छुकांनी आभासी पध्दतीने व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, मराठी विभागप्रमुख रमेश पारेलवार, डॉ.यशवंत घुमे यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment