Ads

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी

Congress Maharashtra State President Nana Patole should be charged and strict action should be taken
 घुग्घुस :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जिल्हा भंडारा येथील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात आज मंगळवार 18 जानेवारी रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, विनोद चौधरी, श्रीकांत पांडे, नरेंद्र कांबळे यांसह अनेक मंडळी सोबत उपस्थित होते.

काही दिवसांआधी, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती मा. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसी नेत्यांमध्ये किती असूया भरली आहे. हे अशा निंदनीय घटनांमधून वारंवार सिद्ध होते.
भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. पंतप्रधान पदावरची व्यक्ती कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षापुरती मर्यादित राहत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करणे. हे प्रत्येकाचं कर्त्तव्य आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment