चंद्रपूर : खेळाबरोबरच प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेण्याची तयारी आहे, तोच स्पर्धक स्पर्धेत व जीवनात यशस्वी होऊ शकतो. खेळाडूंंनी कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे नाव देश स्तरावर व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून जिल्ह्याचा व विभागाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते चंद्रपूर येथील भिवापूर प्रभागात नगरसेवक वसंत देशमुख यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्ष विदर्भ ऑमुचल कबड्डी असो. अशोक देशमुख, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा हौशी कबड्डी सुभाष गौर, माजी गटनेते तथा नगरसेवक वसंता देशमुख, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेवक मंगला आखरे, नगरसेवक सतीश घोनमोडे, सचिव चंद्रपूर जिल्हा कबड्डी असो. दिलीप रामेडवार, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, माजी नगरसेवक अजय खंडेलवाल, सचिव महाकाली क्रीडा मंडळ राजेंद्र आखरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि. नगरसेवक वसंत देशमुख यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या माध्यमातून येथील युवक कबड्डी व इतर क्रीडा क्षेत्रात आपले नाव लौकिक करत आहेत. त्यांच्या कामामुळे विविध क्षेत्रात युवक आपली छाप सोडत आहे. राजकारणा सोबत समाजकार्य करण्याऱ्या दुवा म्हणून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवीत असतात. इतरांनी देखील त्यांचे कार्य समोर ठेवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment