राजुरा :- मागील अनेक महिन्यापासून रस्ता बांधकामाच्या नावावर बांधकाम विभागाची वेळकाढूपणा व या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने त्रस्त रामपूरवासीय जनता रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून रामपूर ते गोवरी रोड माता मंदिर पर्यन्तच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करने, दिवसातून तीनदा रोडवर पाणी मारणे व जड वाहतूक बंद करणे या मागण्यांना घेऊन रामपूर ग्रामपंचायत व जनता यांच्या पुढाकारातून उद्या (दि. २९) गोवरी रोड सास्ती टी-पॉईंट रामपूर येथे १० वाजता रास्ता रोको आंदोलन करीत आहे.
रामपूर ते गोवरी या मुख्य मार्गाचे काम मागील काही महिन्यांपूर्वी चालू केले परंतु अर्धवट काम केले आणि आता सहा ते सात महिन्यापासून काम बंद असून या बाबत बांधकाम विभागाला बऱ्याचदा विचारणा केली असता लवकरच काम चालू होऊन काम पूर्ण होणार हे उत्तर नित्याचेच आहे. या मार्गावर रोज अनेक जड वाहनाद्वारा वाहतूक होत असते आणि याच मार्गाने परिसरातील गावातील लोक ये जा करावी लागत असून या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वस्तीतील घरांमध्ये धूळ जात असल्याने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे जीव घेणे खड्डे पडलेले असल्यामुळे दुचाकी वाहन चालविणे सुद्धा अवघड झालेले आहे दुचाकी वाहनांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बरेचदा अपघात होऊन अनेकाना आपले अवयव गमवावे लागले असून अनेकांची जीवित हानी झालेली आहे.
रस्ता बांधकाम करणे व धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज तीन वेळा पाणी मारण्यासाठी बांधकाम विभागाकडेनिवेदन दिले मात्र अजून पर्यंत याचा काहीही फायदा न झाल्याने आज ग्रामपंचायत रामपूर व समस्त रामपूर ग्राम वासीय यांनी गोवरी रोड, सास्ती टी-पॉईंट रामपूर येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. रास्ता रोको करूनही मागण्या पूर्ण न झाल्यास रोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करून निषेध करण्याचा इशारा सरपंच वंदनाताई गौरकार यांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment