Ads

कोढेगांव परिसरात वाघाचा धुमाकूळ, ग्रामस्थ भयभीत



भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती तालुक्यातील कोंढेगांव (मा.) परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थ भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मोहर्ली येथील ताडोबा बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे नुकतीच केली आहे.
जवळपास शंभरच्यावर ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कोंढेगांव ( मा. ) येथील २०० मीटर परिसरात नेहमी वाघाचा वावर राहतो. पाच दिवसांपूर्वी बकरे, २ गायी, एक बैल आणि एका माणसाला वाघाने जोरदार हमला करून गंभीररीत्या जखमी केले आहे. याची पुरेपुर नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी. या अगोदर सुद्धा ग्रामस्थांनी वन परिक्षेत्र अधिका-यांना अर्जाद्वारे माहिती दिली होती. तरी प्रशासनाच्या वतीने वाघाच्या बंदोबस्तासाठी काहीही पाऊल उचललेले नाही. आतापर्यंत पाळीव प्राण्याची वाघ शिकार करून बळी घ्यायचा. आता गावातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण ? आम्ही अर्जाद्वारे गावातील सर्व हकीकत सांगून सुद्धा वरीष्ठ अधिकारी काही उपाय करणार नाही. तर गावकरी लोकांनी कुणाकडे पहायचं ? असा सवालही ग्रामस्थांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. येथील वाघाच्या बंदोबस्तासाठी योग्य ते पाऊल उचलावे व वाघाचा बंदोबस्त जंगलामध्ये करावा. यामध्ये जिवहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि गावातील लोकांना उर्वरीत शौचालय, गॅस कनेक्शन , गॅस ओटे देण्यात यावे. गावकऱ्यांच्या समस्यांचे योग्य निरसन करून गावकरी लोकांची जिवहानी होणार नाही, या दृष्टीने गावकरी मंडळींना संरक्षण देण्यात यावे. अन्यथा गावकरी मंडळी कार्यालयावर येऊन आंदोलन करणार याची दक्षता घ्यावी. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळुभाऊ धानोरकर, विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, आ. प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड, ताडोबा क्षेत्र संचालक रामगावकर, उपसंचालक गुरुप्रसाद, ताडोबा बफर क्षेत्राचे ए.सी.एफ.येडे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment