चंद्रपुर :-पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक 08/03/2020 रोजी फिर्यादी श्री संजोग अरुणकुमार भागवतकर, क्षेत्रीय प्रबंधक, SBIस्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा कार्यालय चंद्रपुर यांचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क. 267 / 2020 कलम 420,406,409,417, 420,465,466,467,468,471,120 (ब)भा.द.वीचा दाखल केला होता. त्यामध्ये चंद्रपुर जिल्हयातील स्टेट बँक ऑफ इंडीया कडे 44 कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंट मार्फत गृह कर्जासाठी अर्ज केले. सदर प्रकरणी कर्ज प्ररकणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मुल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्जामध्ये वाटप झाले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणीमध्ये बँकेंच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बॅकेंची एकुण 14,26,61,700/ रू. चे फसवणुक fraud झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तकार दाखल केली होती, त्यानुसार प्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास प्रकरण कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात एकुण 11 कर्जधारक एजंट 01 व बॅकेंचे 03 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. या मध्येे श्वेता महेश रामटेके वय ४२ वर्ष धंदा मजुरी रा. पंचशिल चौक वार्ड क्र. १ बाबुपेठ चंद्रपूर.२. सौ. वंदना विजयकुमार बोरकर वय ४० वर्ष धंदा मजुरी रा.नगिनाबाग चोर खिडकी जवळ चंद्रपूर,३. सौ. योजना शरद तिरणकर वय ४२ वर्ष धंदा व्यापार रा. डिसके ग्रिन डुप्लेक्स नं. २५ म्हाडा कालनी दाताळा चंद्रपूर, ४. शालिनी मनिष रामटेके वय ४५ वर्ष रा. धंदा व्यापार रा भंगाराम वार्ड भद्रावती,५. मनिष बलदेव रामटेके वय ४७ वर्ष धंदा व्यापार रा. भंगाराम वार्ड भद्रावती,६. मनिषा विशाल बोरकर धंदा कॅटरींग रा. आंबेडकर वार्ड भद्रावती,७. वृंदा कवडु आत्राम वय ४९ वर्ष धंदा दुकान रा. डिसके कॉलनी बोर्डा वरोरा ता. वरोरा, ८. राहुल विनय रॉय वय ३६ वर्ष धंदा दुकान रा. हॉटेमट कॉलनी माजरी ९. गजानन दिवाकर बंडावार वय ३९ वर्ष रा. धाबा,
१०. राकेशकुमार रामकरण सिंग वय ४२ वर्ष रा. सास्ती राजुरा,११. गणेश देवराव नैताम वय ३६ वर्ष रा. पोंभुर्णा ह.मु. कोसारा,१२. गिता गंगादिन जागेट वय ५३ वर्ष रा. घुग्घुस,१३. पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी वय ३९ वर्ष रा. ह.मु. प्लॉट निर्माण नगर तुकुम चंद्रपूर मुळ पत्ता प्लाटॅन ९१ बंडु सोनी लेआउट परसोडी नागपूर,१४ विनोद केशवराव लाटेलवार वय ३८ वर्ष रा. ह. मु. हनुमान नगर तुकूम चंद्रपूर मुळ पत्ता वार्ड क्र. ४ सावली ता. सावली जि. चंद्रपूर,
१५ .देवीदास श्रीनिवासराव कुळकणी वय ५७ वर्ष रा. मुकूंदनगर अकोला मुळ पत्ता बादुले बुद्रुक ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात भद्रावतील राजकीय नेते तथा प्रतिष्ठित महिलांचा समावेश असल्याचे चर्चा आहे.
सदर प्रकरण पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक मस्के ( आर्थिक गुन्हे शाखा) अधिक तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment