ब्रम्हपुरी :-बेघर नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे,यासाठी शासनाने घरकुल योजना राबवली मात्र प्रत्यक्ष घर बांधताना लाभार्थ्यांना तारे वरची कसरत करावी लागत आहे.घर बांधण्यासाठी मंजूर झालेल्या रक्कमेपैकी बरेच पैसे वाळू खरेदीत जात असल्याने या परिस्थितीत सरकारी घरकुल पैशात घर बांधायचे की वाळुची खरेदी करायची असा सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.तर घरकुल धारकांना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देणारा तो जी. आर तालुक्यातून गायब झाल्याने तालुका प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर येत आहे.
प्रधानमंत्री आवास' 'रमाई आवास' 'शबरी घरकुल' या योजनांचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या..?, अनुदान वेळेत मिळाले का..? असे प्रश्न आज घडीला घरकुल लाभार्थ्यांच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र लोकसेवक, लोकप्रतिनिधींना भान नसणे ही मोठी शोकांतिका आहे. पर्यावरण अनुमती (EC) च्या नावाने बोंबा ठोकत तालुक्यातील रेती घाट मागील तीन वर्षापासून लिलावात काढले गेले नव्हते त्याच दरम्यान अवैध उत्खननाने तालुक्याला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून दिलाय मात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यात यावी असा शासनाचा जी.आर असतानासुद्धा नियोजन शून्य कारभार व प्रशासकीय उदासीनतेने गरीब घरकुल लाभार्थी आजतागायत मोफत वाळूच्या लाभापासून वंचित आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्यासारखे कुशल नेतृत्व ब्रह्मपुरी विधानसभेला आमदार म्हणून लाभले असतांना सुद्धा घरकुल लाभार्थ्यांची विवंचना स्व:पक्षातील कार्यकर्ते व गरीब घरकुल लाभार्थी मांडत असतांना न्याय मिळू नये त्यापेक्षा ते दुर्दैव काय..? असे आज घडीला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून तालुक्यात सर्वत्र चर्चील्या जात आहे
0 comments:
Post a Comment