Ads

चॉकलेट व केक चे आमिष दाखवीत 4 वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार


4 year old Chimukali was tortured by showing the lure of chocolate and cake

चिमूर प्रतिनिधी :-चिमूर तालुक्यातील गदगाव येथील 4 वर्षाच्या - मुलीवर चॉकलेट व केक देण्याचे आमिष देत लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 27 फेब्रुवारीला पीडित मुलीचे आई-वडील शेतात कामाकरिता गेल्यावर 4 वर्षाची मुलगी घरी एकटीच होती.
आरोपी 21 वर्षीय निखिल रमेश पिंपळकर याने संधी साधत चिमुकलीला चॉकलेट व केक देण्याचे आमिष दाखवीत तिच्यावर अत्याचार केला.

मुलीचे आई-वडील घरी आल्यावर सदर प्रकार त्यांना समजला असता याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली, पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवीत आरोपी निखिल पिंपळकर ला अटक केली. Poccso

सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन चिमुर येथे प्राप्त तक्रारीवरुन अपराध क्रमांक ६७ / २०२२ कलम ३७६ (१), ३७६ (AB) भारतीय दंड संहिता तसेच कलम ४ लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन संजय सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक दंडवते या गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment