चंद्रपुर :-पुढील आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पातून कर रचनेत कोणताही बदल न केल्यामुळे मध्यमवर्गीयांची व नौकरदारांची घोर निराशा झाली आहे. तसेच या अर्थसंकल्पातुन पाहिजे तसा रोजगार निर्मितीवर भर न दिल्यामुळे रोजगार निर्माती मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. अनेक वस्तु स्वस्त व अनेक वस्तु महाग केल्यामुळे केंद्र सरकारचे उत्पन्नच वाढविण्याचे या अर्थसंकल्पातुन भर दिला आहे पायाभूत सुविधेसाठी मात्र चांगली तरतूद केली आहे. रस्ते हवाई वाहतुकीसाठी व ई व्हेइकल साठी चांगली गुंतवणूक आवश्यक आहे ती सुद्धा तुटपुंजीच वाटते. अल्प व मध्यम घटकाच्या साठी चांगली केली आहे. तसेच सर्वसामान्य शेतकन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दिसून येतो. हा अर्थसंकल्प दिर्घकालीन दूरदृष्टी व भविष्यकालीन अपेक्षा लक्षात न घेता तात्पुरता असल्याचे दिसून येते. मध्यमवर्गीय समाजावर भार पडेल तसेच महागाई वाढतीच राहील असेच काहीसे चित्र या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment