चंद्रपुर :-दिनांक १८ डिसेंबर २०२१ पासुन महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या बेमुदत संपाला सुरूवात झाली असुन अजुनही महाराष्ट्र सरकारने त्याच्या मागण्याची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्रातील तील सर्व विद्यापीठातील व महाविद्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असुन विद्यार्थ्यांना व पालकांना नाहक त्रास होत आहे. कर्मचा-यांच्या प्रमुख मागण्या - २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेंशन लागू करावी, सेवातर्गत आशवाशित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे रिक्त पदे त्वरीत भरावे, कर्मचा-यांचे सेवा निवृत्ती वय ६० वर्ष करावे, ५ दिवसाचा आठवाडा लागु करावा तसेच ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ द्यावी, या व इतर १३ मागण्याकरीता हा संप सुरू आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या संपाला व कर्मचा-यांच्या न्याय मागण्याना बिनाशर्त पाठींबा आज दिला असुन याप्रसंगी राष्ट्रीय समन्वयक डॉ अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, सचिव विजय मालेकर, संजय सपाटे, संजय चरडे, कुणाल चहारे, जोत्सना लालसेरे, विद्या शिंदे, मंजुळा डुडुरे, मिना गोहोकार शितल पाटील, शारदा नवघरे तसेच इतर पदाधिका-यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कर्मचा-यांच्या संपाला पाठींबा दिल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी संपकरी कर्मचारी दिनेश अडवाले, सचिन सुरवाडे, गजानन काळे, राकेश कन्नाके, राहुल देशमुख, किंगरे, राजु जुमडे, योगीता रायपुरे करूना मानकर, संगीता सहारे, विप्रा पाटील, वैशाली आवळे अविनाश घंटे, प्रशांत रदई, धादे, प्रविण वासेकर, जयेश वेले, अरून चिलकोटी, संजय डाखरे इत्यादी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment