Ads

ऊर्जानगरात ग्रामगीता तत्वज्ञान आचारकार्य शिबीर संपन्न.

चंद्रपूर (ऊर्जानगर):-
चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र ऊर्जानगरच्या वसाहतीत दिनांक 19 ते 20 फेब्रुवारी 22 दरम्यान श्री ‎गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता तत्वज्ञान आचारकार्य शिबीर संपन्न झाले.
शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 22 ला शिबिराचे उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी मंडळाचे सेवाधिकारी शंकर दरेकर होते. चं म औ वि केंद्राचे उपमुख्य अभियंता किशोर राऊत याचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मा सुबोधदादा संचालक भु-वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी तह. ब्रम्हपुरी , प्रमुख अतिथी डॉ नवलजी मुळे निसर्गोपचार तज्ञ,अड्याळ टेकडीच्या महिला आश्रमप्रमुख सुश्री रेखाताई, भ्रस्टाचार निर्मूलन समिती चंद्रपूर अविनाश आंबेकर,सुधाकर काकडे व्यवस्थापक लेखा सी टी पी एस,मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर गोहणे, महिलाध्यक्षा सुषमा उगे यांची प्रमुख उपस्थिती होती.या दोन दिवशीय शिबिरात सामुदायिक ध्यान, प्रार्थना, योगा प्राणायाम व ग्रामगीता तत्वज्ञानावर मार्गदर्शन, चिंतन व चर्चा सत्र, सात्विक आहार इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. उदघाटन कार्यक्रमप्रसंगी शब्बीर शेख व चमुंनी अड्याळ टेकडी येथील गुरुकुलासाठी ब्लॅंकेट व गोहणे परिवारानी तुकडोजी महाराज व तुकारामदादा यांचे तैलचित्र सत्संग भावना साठी भेट दिली.

शिबिराकरिता ऊर्जानगर, तुकूम, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, चिमूर तालुक्यातील पुयार्दंड भिसी, अड्याळ टेकडी, शिंदेवाही येथील 50 शिबिरार्थीनी सहभाग घेतला होता.

वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजानी सांगितलेले श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मूलभूत तत्वज्ञान मंडळातील सेवकांना समजावे व त्यांच्या मनात रुजावे याकरीता श्री गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगर द्वारा दोन दिवशीय चिंतनशिल शिबीराचे आयोजन केले होते.
सदर शिबीराला जीवनात जोडता आले पाहिजे. देहाच्या अवस्था स्थूल, कारण, महाकारण याचे विष्तृत माहिती, त्रिविध ताप, जन्म व मरनाचा खुलासा, मानव धर्म म्हणजे आत्म धर्म इत्यादी विषयावर सुबोधदादांनी विस्तृत माहिती पुरुष व महिला शिबिरार्थी यांना दिली.
आत्मतत्वाचे ज्ञान शुद्ध आहार विहाराने होते असे विचार निसर्गोपचार तज्ञ् डॉ नवलाजी मुळे यांनी मांडले. ते पुढे म्हणाले सर्व इच्छा सोडून मनाने मौनी व्हावे. कोणते अन्न खावे, कोणते अन्न खाऊ नये, अन्न कशे शिजवावे. आहाराचे नियोजन करून रोगाचे निर्मूलन कसे करावे इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.
महिला आश्रमच्या सुश्री रेखाताई यांनी कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था, स्त्री पुरुषात वास करणारी परमेश्वरी शक्ती, कुटुंबं धर्म कसा पार पडता येईल, आपल्यातील आत्म धर्म कसा प्रगट करता येईल, समाज परिवर्तनसाठी महिलांनी गर्भधारणा व आरोग्य दोन सूत्र इत्यादी विषयावर महिलांना सखोल मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात 30 शिबिरार्थी यांनी शिबिराचे अनुभव व संकल्प घेतले. यावेळी शिबिरार्थी नितेश मेश्राम सिंदेवाही यांनी दारू सोडण्याचा संकल्प केला. आर्थिक सहाय्यक, प्रार्थनेला येणे, चहा सोडणे इत्यादी संकल्प घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष नाना बावणे यांनी केले तर प्रस्तावणा अध्यक्ष मुरलीधर गोहणे यांनी केली आणि आभार कोषाध्यक्ष देवराव कोंडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment