चंद्रपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा सुरू असलेल्या सर्वच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेतून दरवर्षी विद्यार्थ्यांना फायदेशीर असे उपक्रम हाती घेतले जातात. यावर्षी सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटने 'नीट आणि जेईई' च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली असून, चंद्रपूर येथील सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटच्या सोमय्या पॉलिटेक्नीक कॅम्पसमध्ये आणि भद्रावती येथील मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १४ शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. मागील १५ वर्षात या मंडळाच्यामार्फत चालविल्या ते जाणाऱ्या संस्थांनी प्रस्थापितांना जोरदार धक्केही दिले आहे. सोमय्या पॉलिटेक्नीक, सोमय्या खासगी आयटीआय, ज्युनिअर सायन्स कॉलेज, पॅरामॉऊंट कॉन्व्हेंटच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे करण्यात आला.
त्यामुळे या संस्थेने आता शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या संस्थांचा निकाल १०० टक्के असून आतापर्यंत २०७ विद्यार्थी मेडिकलला गेले. तर १५० विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. जवळपास २०० संगणकांची भव्य लॅब आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी ही लॅब अत्यंत आवश्यक असून, इतर कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये ती नाही. इयत्ता दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी 'नीट आणि जेईई' साठी तयारी करतात. अनेक मोठ्या खासगी शिकवणी वर्गांकडून 'नीट आणि जेईई'च्या नावावर अक्षरशः लूट चालवली आहे. मुलाच्या शिक्षणात कोणतीही तडजोड न करता पालक मात्र, खासगी शिकवणी वर्ग घेतील शुल्क देऊन मुलांना शिकवत आहेत. प्रचंड लूटमार सुर असताना सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटने सामाजिक जाणीव दाखवत नवीन उपक्रम हाती घेतला आहे. 'नीट आणि जेईई'च्या अभ्यार साठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची चंद्रपूर आणि
भद्रावतीच्या केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेणार आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'लक्की ड्रा' सुद्धा ठेवला आहे. लक्की ड्रॉमध्ये इलेक्ट्रीक बाइक, लॅपटॅप आणि मोबाइल फोनचा समावेश आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये टॉप असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिकवणी शुल्कात २० ते ५० टक्के सूट मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पण, होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी समजली जात आहे. गरीबातील गरीब विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहू नये. शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे समाजाचे हित लक्षात घेवूनच हा उपक्रम हाती घेत असून, अशा समाजपयोगी उपक्रमासाठी प्रसंगी नुकसानही सहन करावे लागले तरी हरकत नाही. पण, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यालासुद्धा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही या मागील भूमिका असल्याचे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment