चंद्रपूर :- मागील काही महिन्यांपासून चंद्रपुरात घरफोडीचे प्रमाण वाढत असून गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घरफोडी चा तपास करण्यासाठी पोउपनी अतुल कावळे यांच्या नेतृत्वात पथक बनवीत पुढील निर्देश दिले.
26 फेब्रुवारीला गोपनीय माहितीच्या आधारे अतुल कावळे व पोलीस कर्मचारी यांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले, चौकशी केली असता त्या इसमाने आपले नाव वलेश कनक बुवारीया वय 27 वर्षे रा. छत्तीसगड राज्य असे सांगितले पोलिसांनी त्याचें जवळून एक लॅपटॉप, चार्जर व मोबाईल जप्त केला. बुवारीया ची कसून चौकशी केली असता त्याने तो लॅपटॉप चोरी केला असल्याचे सांगितले व आज मी गावी जाऊन तो लॅपटॉप विकणार होतो अशी माहिती दिली. Lcb chandrapur
सदर लॅपटॉप 4 महिण्याआधी एका बंद घराचा ताला तोडून चोरी केला असल्याची कबुली दिली, सोबत तुकूम, दुर्गापूर, वृंदावन नगरात सुद्धा घरफोडी केली असल्याची बुवारीया ने कबुली दिली.
आरोपी जवळून 3 लैपटॉप, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Burglary case
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि बोबडे, पोउपनी संदीप कापडे,अतुल कावळे, नईम खान, संजय आतकुलवार व पोलीस
कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
0 comments:
Post a Comment