चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण (प्रपत्र - ड) मधील राज्यातील ग्रामपंचायतमध्ये सादर सर्वेक्षणाची माहितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. परंतु या याद्या आवास सॉफ्ट प्रणाली वरून काढल्यास या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुट्या आढळून येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील 'ड' यादीतील अडचणी तात्काळ दूर करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने सुचविलेल्या प्रपत्र - 'ड' लाभार्थ्यापैकी काही लाभार्थी प्रत्यक्षात पात्र आहेत. परंतु त्यांची नवे आवास प्लस यादीतील अपात्र यादीमध्ये समावेश आहे, ग्रामसभेने सुचविलेल्या प्रपत्र - 'ड' मधील काही लाभार्थ्यांचा तांत्रिक अडचणीमुळे आवास प्लस ऍपद्वारे सर्वेच झालेला नाही. त्यामुळे त्यांची नावे पात्र यादी किंवा अपात्र या दोन्ही ठिकाणी दिसून येत नाही, ग्रामसभेने सुचविलेल्या प्रपत्र - 'ड' मधील लाभार्थ्यापैकी काही लाभार्थीचा आवास प्लस ऍपद्वारे सर्वे झालेला आहे. परंतु त्याचा डाटा तांत्रिक अडचणीमुळे अपलोड न झाल्यामुळे त्यांची नवे पात्र यादी किंवा अपात्र यादी या दोन्ही ठिकाणी दिसून येत नाही, काही ग्रामपंचायतीचा आवास प्लस ऍपद्वारे सर्वेच झालेला नाही व त्यामुळे अशा ग्रामपंचायतीच्या याद्याच प्राप्त झालेल्या नाही.
आवास प्लस डेटाबेसमधील याद्यांमध्ये त्रुट्या असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे त्रुटयांची पूर्तता करण्यासाठी विशेष बाब या सदराखाली चंद्रपूर जिल्ह्यातील आवास प्लस ऍप पूर्णतः सुरु करून देण्यात यावे. त्यामुळे ग्रामसभेने सुचविल्याप्रमाणे त्यामध्ये दुरुस्ती करून पात्र लाभार्थ्यांना योग्य न्याय देता येईल त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेतील 'ड' यादीतील अडचणी तात्काळ दूर करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment