Ads

वनविभागाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या नितीन भटारकर यांच्या उपोषणाची सांगता.

Conclusion of Nitin Bhatarkar's fast which is going on in protest of Forest Department.

चंद्रपूर :- दुर्गापुर, ऊर्जानगर व लगतच्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला होता.

मागील काही महिन्यात झालेल्या या प्राण्याच्या हल्ल्यात या परिसरातील जवळपास ७ ते ८ सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
म्हणून या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.

दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवशी या परिसरातील २ नागरिकांचा या प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला गेल्या असल्याने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासून नितीन भटारकर यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली होती.

आमरण उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासन व वन विभाग खडबडून जागे झाले असून ज्या मागणीकरिता मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता या मागणी संदर्भात वनविभागाने परिसरातील एक मादी व दोन नर अशा एकून तीन नरभक्षक वाघांना बेहोश करून पकडण्याचा वरिष्ठ स्तरावरून लेखी आदेश काढला.

तसेच या संपुर्ण परिसरात असलेले इतर वाघ, बिबट्या व अस्वल यांना या परिसरातून कायमचे स्थलांतरित करण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भात देखील लवकरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले.

सिनाळा, दुर्गापुर व WCL ला लागुन असलेले क्षेत्र, नेरी, कोंडी या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून एका १६ वर्षीय युवकाला बिबट्याने ठार केले होते व म्हणून बिबट्याला पकडण्या करिता फक्त एक पिंजरा वनविभागातर्फे लावण्यात आला होता त्या पिंजरांच्या संख्येत वाढ करून डब्लू. सी. एल. कॉलनी, दुर्गापूर सब एरिया ऑफिस च्या मागे, नेरी व कोंडी अशा विविध क्षेत्रात कमीत कमी पाच पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावावे अशी मागणी केली असता वनविभागाने ती सुद्धा मान्य केली.

तसेच या दोन्ही क्षेत्रात वन विभागाने अधिकृत कमीत कमी २ चौकी देऊन त्यात २४ तास वन खात्याचे कर्मचारी ठेवावे ही मागणी केली असता ती सुद्धा मान्य केली.

या क्षेत्रात वाघ, बिबट्या व अस्वल तसेच इतर अन्य हिंस्र प्राण्यांच्या वावर असल्याने सर्वसामान्यांना हे प्राणी दिल्यानंतरही वन खात्यातील अधिकार्‍यांशी संपर्क साधता येत नाही म्हणून वन विभागाने एक मोबाईल क्रमांक जाहीर करून त्या क्रमांकाची प्रसिद्धी करावी जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना त्या नंबरवर संपर्क साधता येईल तेव्हा या मागणीला सुद्धा वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या पंधरा दिवसात या सगळ्या मागण्या सकारात्मकपणे पूर्ण करण्यात येईल असे आश्वस्त केले.

मागील सहा दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता ऊर्जानगर व दुर्गापुर वासियांनी स्वेच्छेने एकत्रित होऊन आज बाजारपेठ बंद ठेवुन भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात या परिसरातील दुर्गापुर संघर्ष समिती, वेकोलिच्या कामगार संघटनां, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रतील कर्मचाऱ्यांच्या संघटनां, राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यक्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. व उपोषनास्थळी या परिसरातील भव्य मोर्चातील नागरिकांनी येऊन जोरदार नारेबाजी करून समर्थन केले.

त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. अरविंद साळवे साहेब, वनखात्याचे अधिकारी मा. खाडे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिऱ्हे, इंटक संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव मा. के. के सिंग साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष श्री राजीव कक्कड, इंटकचे जिल्ह्याचे नेते मा शंकरजी खत्री, दुर्गापूर संघर्ष समितीचे मुख्य संयोजक मा. बाळू चांदेकर जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, श्री मुन्ना आवळे जी, पंचायत समिती सदस्य पंकजजी ढेंगारे, शिवसेना नेते शालिक भाऊ फाले, विधानसभा अध्यक्ष श्री सुनील भाऊ काळे, श्री प्रदीपजी ढाले, श्री अभय मस्के जी, माजी सरपंच श्री सुज्योत भाऊ नळे यांच्या हस्ते उपोषणाची सांगता केली.

यावेळी माजी सरपंच श्रीमती मायाताई मुन, माजी सरपंच श्री अमोल ठाकरे, उर्जानगर च्या माजी सरपंच श्रीमती प्रतिभाताई खन्नाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री अंजय्या मुस्समवार, उपाध्यक्ष श्री दिपक भाऊ कुंडोजवार, दुर्गापूरच्या सरपंच सौ पूजाताई मानकर, ऊर्जानगर च्या सरपंच मंजुषा ताई येरगुडे, दुर्गापूर चे उपसरपंच प्रज्योत भाऊ पुणेकर, ऊर्जानगर चे उपसरपंच अंकित भाऊ चिकटे या दोन्ही ग्रामपंचायतीचे सन्माननीय सर्व सदस्य, मनसे कामगार संघटनेचे नरेंद्रजी रहाटे, शिवसेना कामगार संघटनेचे श्री राहुलजी बेले, श्री कोटरंगे जी, श्री संजय भाऊ भगत, श्री गुरु भगत, भीम ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष श्री शैलेश शेंडे जी, सदस्य श्री राजूभाऊ डोमकावळे श्री भरत रायपुरेजी, ऊर्जानगर कामगार सोसायटीचे श्री जगदीश जी परडक्के, सिटू या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री वामन बुटले साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री सुजित उपरे, पॉवर फ्रंट चे अध्यक्ष श्री युवराज जी मैंद, भारिप बहुजन महासंघाचे कामगार अध्यक्ष श्री सुरेश जी भगत, उलगुलान संघटनेचे श्री रवि पवार जी, श्री गुरु भगत जी, श्री रमेश जी वर्धे, श्री प्रकाश जी वाघमारे, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय भाऊ शेजुळ,
माजी सदस्य सौ सपना ताई गणवीर, श्री राजेंद्र जी मेश्राम, श्री सूमेघ मेश्राम, श्री अनुकूल खन्नाडे, श्री लोकेश जी कोटरंगे, युवा सोशल फाउंडेशन चे अनुज भगत, वंश निकोसे, ग्रामपंचायत चे कर्मचारी संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,
व या परिसरात सर सन्माननीय सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment