चंद्रपूर :- येथील वीज केंद्र परिसरात वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे वाघ व बिबट- मानव संघर्ष सुरु झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वाघ जेरबंद करण्यात येणार असून, पकडलेल्या वाघाना नैसर्गीक अधिवास दया, अशी मागणी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांच्याकडे केली.
मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रत्यक्ष भेटीतील चर्चेदरम्यान वीज केंद्र परिसरातील पकडण्यात येणाऱ्या मात्र मनुष्यहानीस जवाबदार नसलेल्या वाघांना निसर्गमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत संबधीतांना योग्य ते निर्देश दिले जाईल, असे आश्वासन दिले.
सध्या चंद्रपूर शहरालगतच्या महाऔष्णीक वीज केंद्रात वाघ- मानव संघर्ष तर वेकोलीच्या परिसरात शक्तीनगर व दुर्गापुर वस्तीत लागुन ‘बिबट-मानव संघर्ष’ वाढलेला आहे. घटनेची तिव्रता बघता वनविभागकडुन सिटीपीएस परिसरातील वाघ पकडण्याचे आदेश प्राप्त आहेत. यात ज्या वाघांमुळे समस्या आहे ते पकडले जातील आणि अन्य सुध्दा, जे वाघ मानवी जिवीतास धोकादायक आहे. त्यांना कायम पिंजरा जेरबंद ठेवण्यात यावे, मात्र सदर औद्योगिक सिएसटीपीएस भागातील जे ‘वाघ’ कुठलाही मानवी घटनेत सहभाग नसलेल्या वाघांना त्याचे योग्य पुनवर्सन म्हणजे नैसर्गीक अधिवासात मुक्त करण्यासाठी नियोजन आखण्याची विनंती बंडु धोतरे यांनी केली.
वाघ पकडण्यात आल्यानंतर त्यांना वनविभागकडुन वनक्षेत्रात मोठे ‘एनक्लोजर’ मध्ये ठेवण्यात यावे. वाघांचे शिकारीचे तंत्र विकसित करण्यात यावे, सदर वाघांचा अभ्यास करून, इतरत्र सोड़णे शक्य असल्यास त्यांना निसर्गमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्यातिल वाघविरहीत असलेल्या वनक्षेत्रात सोडण्याच्या दृष्टीने सुध्दा विचार करण्याची विनंती बंडु धोतरे यांनी प्रधान मुख्य वनंसरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांचाकडे केली.
*सीसीटीपीएस व वेकोली च्या परिसर पाहणी*
आजच्या चंद्रपूर दौरा निमित्त पीसीसीएफ सुनील लिमये यांनी सीसीटीपीएस व वेकोली च्या वन्यप्राणी मानव संघर्ष असलेल्या प्रभावित क्षेत्रात, मनुष्यहानी झालेले क्षेत्र तसेच दोन्ही औद्योगिक क्षेत्रातील वाघ-बिबट करिता प्रोसीपीस चे काटेरी झुडुप, स्वच्छता विषयक कामाची माहिती घेतली. तसेच वनाधिकारी, सिटीपीएस व वेकोली अधिकारी यांची बैठक घेतली.
0 comments:
Post a Comment