Ads

CTPS वीज केंद्रात वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार.

CTPS power station worker killed in tiger attack
चंद्रपुर :-चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामगारावर वाघाचा हल्ला tiger attack झालाय. रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. कोळसा वॅगन अनलोडिंग परिसरात जात असताना हा हल्ला झालाय. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत होता. काल रात्री पण या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला

भोजराज यांची सायकल रस्त्यावर पडून होती, 13 नंबर गेट वरील घटना आहे. कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. काही दिवसा पूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेल्याची घटना घडली होते. या हल्ल्याने वीज केंद्रातील वन्यजीव वावराचा प्रश्न गंभीर झाला आहे.
वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी अनेकांनी दिले निवेदन !
सिटीपिएस मध्ये धुमाकूळ घातलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मंत्र्यांना निवेदने दिली मात्र वनविभागाला वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी वेळच मिळेना अशी गत निर्माण झाले झालेली आहे. शिवसेनेचे कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र वनविभागा नागरिकांचे बळी जाताना उघड्या डोळ्यांनी बघत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची कोणतेही प्रकारची कार्यवाही करत नाही आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment