Ads

महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्या वतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण तालुका प्रशिक्षण केंद्र , पंचायत समिती नागभीड येथे 'आरंभ'

चंद्रपुर :-आज दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे तालुका प्रशिक्षण केंद्र , पंचायत समिती नागभीड येथे ' आरंभ ' ( ०ते३ वर्ष वयोगट ) सुरुवातीचे क्षण मोलाचे या विषयासंबंधी ५ दिवसीय निवासी जिल्हा स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून आरंभ प्शक्षणाचे उद्घाटन मा.प्रणाली खोचरे मॅडम गट विकास अधिकारी नागभीड यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. मडावी सर, तालुका आरोग्य अधिकारी नागभीड यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मा. पूनम गेडाम मॅडम बाल विकास प्रकल्प अधिकारी चिमूर , मा.माधुरी भंडारे बाल विकास प्रकल्प अधिकारी ब्रम्हपुरी, मा.राजेंद्र ठोंबरे सर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड, मास्टर ट्रेनर तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. बालपणीच बालके फार निर्भय व जिज्ञासू असतात. आपल्या आजूबाजूच्या वस्तू व लोकांना संदर्भात जाणून घेण्यासाठी ते सतत उत्सुक असतात. हे अत्यंत आवश्यक आहे की कुटुंबाने बालकाचे पालन पोषण फार काळजीपूर्वक करावे, जेणेकरून बालक आपले आई-वडील व इतर लोकांसोबत एक मजबूत आणि भावनिक संबंध प्रस्थापित करू शकेल. बाल विकासाच्या काळजीची ही योजना शक्य त्या उपलब्ध संशोधनावर आधारलेली आहे. या संशोधनाने दाखवून दिले आहे की बालकांचा आहार, आरोग्य आणि मानसिक वाढ याबाबत सर्वंकष मार्गाचा अवलंब केल्यास ते परिणामकारक होतील. त्यासाठी बालकाच्या विकासाकरिता निगा राखणार्‍या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे असते. याकरिता आरंभ प्रशिक्षणाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना जिल्हा स्तरीय प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या बिट लेव्हल वर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देतील व अंगणवाडी सेविका आपापल्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, स्तनदा माता व 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालके यांना गृहभेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणाचे उद्घाटन समारंभाचे संचालन श्रीमती निमजे पर्यवेक्षिका यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती गीता जांभुळे पर्यवेक्षिका यांनी केले तसेच आभार श्रीमती तितरे सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment