Ads

शेतकरी कर्जमाफी करीता शेतकरी बांधवांनो एकत्र या :- योगेश खामनकर

Farmers Should come together for debt Crop loan - Yogesh Khamankar
चंद्रपुर :-शेतकरी कर्जमाफी चा विषय हा शासनाच्या उदासीनते मुळे अडून आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असो वा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असो या दोन्ही योजना मधील पात्र 36000 शेतकरी आहेत. दोन्ही योजनांचा आढावा आमदार सूधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानभवन येथे घेतला होता तेव्हा वित्त विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी दिवाळीच्या आधी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील शेतकऱ्यांना लाभ देण्याचे मान्य केले होते व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना मार्च पर्यंत लाभ देण्याचे मान्य केले पन शेतकऱ्यांना आज पर्यंत कूठला हि लाभ मिळू शकला नाही, म्हणून तोहोगाव येतील शेतकरी बांधवानी मा अजीत दादा पवार यांना अर्थसंकल्पीय अधीवेशनात कर्जमाफी करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावी या करीता पत्र पाठवले व मागणी केली तेव्हा प्रामुख्याने बंडू गौरकार किशोर कासनगोट्टूवार, बंडू धोटे, रमेश राऊत, संदीप बुक्कावार, गंगाधर वाघाडे, योगेश खामनकर, प्रदिप निवलकर, गूलाब रागीट व मोठ्या संख्येत महिला व पूरूष शेतकरी हजर होते थे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment