Ads

*मा.खासदार बाळू भाऊ धानोरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिऱ्हे यांनी दिला नितीन भटारकर यांच्या उपोषणाला पाठींबा.

चंद्रपूर:-
दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन उपोषनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन केली आहे.

सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.

तसेच आज मा. खासदार बाळू भाऊ धानोरकर, शिव सेनेचे जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिर्हे व काँगेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विनोद भाऊ दत्तात्रेय यांनी स्वतः आपल्या पदाधिकाऱ्यांसह उपोषणास्थळी येऊन पाठींबा दिला असल्याने या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.

खगोलशास्त्राचे अभ्यासक निसर्गवादी मा. सुरेश चोपणे सर, भुगोलशास्त्राचे प्राध्यापक निसर्गप्रेमी मा. योगेश दुधपाचारे सर व पर्यावरणतज्ञ प्रा. डॉ. सचिन वझलवार सर यांनी दिली नितीन भटारकर यांच्या उपोषणाला भेट.
चंद्रपूर:- दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघ व बीबट यांच्या हल्ल्यात मागील काही महिन्यात ७ सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेला असल्याने वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे.

सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.

या गंभीर विषयासंदर्भात सुरू असलेल्या या उपोषणाला खगोलशास्त्राचे अभ्यासक निसर्गवादी मा. सुरेश चोपणे सर, भुगोलशास्त्राचे प्राध्यापक निसर्गप्रेमी मा. योगेश दुधपाचारे सर व पर्यावरणतज्ञ प्रा. डॉ. सचिन वझलवार सर यांनी स्वतः उपोषणास्थळी येऊन मौलिक मार्गदर्शन केले तसेच या गंभीर विषयावर दूरगामी उपाययोजना संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन करून मनोबल वाढविले.

जिल्ह्यातील या तज्ञ व अभ्यासकांनी उपोषणाला भेट दिली असल्याने या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment