भद्रावती:-इतिहासात विविध राजांचे दाखले दिले जातात.
पराक्रमी राजांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा म्हटलं तर छत्रपती शिवरायांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही.कारण शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले.ते निसर्ग प्रेमी होते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांवर प्रेम केले.त्यांचा लढा नेहमी समाजातील वाईट वृत्तीसी होता ना की कोणत्या जाती धर्मासी...जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान देणारा होता माझा 'राजा'....म्हणून आजमितीच्या राजकारणात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा वापर करू नये....असा संदेश चिमुरड्या मावळ्यांनी राजकारण्यांना दिला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चुटकी बहुद्देशीय विकास संस्था गवराळा येथे आयोजित बाल मावळ्यांनी आपल्या वक्तृत्वात महारांजाच्या जीवनावर बोलका प्रकाश टाकला.
संस्थेचे संस्थापक लिमेश माणुसमारे यांनी परिसरातील चिमुरड्या मुलांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे जाणून घेण्याकरिता त्यांना शिवजयंती निमित्त वक्तृत्वाची संधी दिली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावातील जेष्ठ नामदेव बदखल तर शामराव खापणे, संदीप मेंढे,सरवर अली,मुन्ना वाघमारे,शांता गोवारदीपे, रत्ना खडसे,सौ.इनामे यांची प्रमुख उपस्थिती होती.लहान मुलांसाठी आयोजित वक्तृत्व संधीत कु.नंदिनी आमटे,समीक्षा आमटे,प्रीती कुळमेथे,आरोही खडसे यांनी सहभाग घेतला.प्रसंगी त्यांना संस्थतर्फे उपस्थित मान्यावरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा अर्चा करण्यात आली.प्रास्ताविक तथा संचालन संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणुसमारे यांनी तर आभार सौ उज्वला इनामे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामकर आत्राम,सुरेश पेंदाम,महेंद्र ढेंगळे, शंकर डोंगे आदींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment