Ads

23 मार्च रोजी डाक विभागाच्या विविध योजनांचा मेळावा

चंद्रपूर :- चंद्रपूर, पोस्टल विभागातर्फे दि .23 मार्च 2022 रोजी कामगार कल्याण मनोरंजन केंद्र मार्केटसमोर सीटीपीएस वसाहत येथे डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये आधार सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (नवीन खाते उघडणे, आयपीपीबी (IPPB) खाते त्यांच्या पोस्ट ऑफीस बचत (POSB) खात्याशी जोडणे, AEPS पैसे काढणे, आधार नुतनीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत नाव नोंदणी आदी करण्यात येणार आहे.
त्यासोबतच पोस्ट ऑफिस बचत खाते , प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, माय स्टॅम्प, नवीन पोस्टल विमा तसेच ग्रामीण विमा योजना, गंगाजल विक्री या योजनांचा समावेश आहे. ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपले ओळखपत्र, (आधारकार्ड, पॅनकार्ड), निवासी पुरावा व 2 पासपोर्ट साइज फोटोसह सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थ‍ित राहावे, आणि डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment