Ads

भद्रावती नगर परिषद द्वार थकीत मालमत्ता कर धारकाकडुन सक्तीने कर वसुली

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील मालमत्ताधारक त्यात थकीत व चालु मालमत्ता कर, पाणी (पटटी कर तसेच नगर परिषदेच्या मालकीचे दुकान गाळयांचे भाडे वसुली करीता जप्ती पथक तयार करण्यात आलेले असुन पथकान्दारे नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकाकडुन सक्तीने कर वसुली करण्यात येत आहे.
आज दिनांक २२/०३/२०२२ ला भद्रनाग मंदिर दुकान गाळयाचे थकीत असलेले भाडे व मालमत्ता कर वसुली करीता शुभम वासमवार, विठठल वासेकर,. निळकंठ जेनेकर, गब्बर सिंग जुनी यांचेकडे असलेल्या दुकान गाळयांना शिल ठोकण्यात आलेले आहे. गणेश मंदिर येथील दुकान गाळयांचे भाडे थकीत असलेल्या दुकान धारकांना सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. तसेच नगर अरिषद क्षेत्रातील नागरीकांनी त्याचेकडे असलेला थकीत रकमेबाबतची जप्ती टाळण्याकरीता मालमत्ता कर, पाणी पट्टी कर व दुकान गाळे भाडे व मालमत्ता नगर पालिकेत जमा करण्याकरीता सुटटीच्या दिवशी कार्यालय सुरू असल्याबाबतच्या सुचना स्पिकरव्दारे कळविण्यात येत आहे..


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment